Tuesday, October 10, 2017

कोरेगाव पार्क- घोरपडी प्रभाग महानगरपालिका पोटनिवणूकीसाठी प्रतिबंधात्मक आदेश


            पुणेदि10: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने कोरेगाव पार्क-घोरपडी (प्रभाग क्र.21-अ) या महानगरपालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी 11 ऑक्टोबर, 2017 रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक 12 ऑक्टोबर, 2017 रोजी होणार आहे.
            मतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राचे परिघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरामध्ये सार्वजनिक सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिगडू नये, सदर परिसराचा प्रचार व इतर कारणांसाठी गैरवापर होऊ नये यासाठी सह पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये एकूण 20 मतदान केंद्र व 65 बुथ  परिसरात दि.11 ऑक्टोबर 2017 रोजी 00-01 पासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
            मतदान केंद्र परिसरात राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्षाशी संबंधीत असलेली कोणतीही व्यक्ती ही ज्या वार्डाचे मतदार नाहीत त्यांनी या वार्डात थांबण्यास अथवा वास्तव्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
            मतमोजणी  केंद्र परिासरात मतमोजणी पूर्ण होईपर्यत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेतयानुसार मतमोजणीच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अधिकृत- अनधिकृत हत्यारे नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मोबाईलकॉर्डलेस फोनपेजर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणीच्या परिसरात खाजगी इसमांना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहेमतमोजणीच्या परिसरात कोणताही मजकूर लिहीण्यास अगद छापील मजकूर प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात अली आहेमतमोजणीच्या परिसरात शासकीय वाहन सोडून कोणत्याही प्रकारचे वाहन आत नेण्यास मनाई करण्यात आली आहेमजमोजणी परिसरात पासशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहेमतमोजणीचा निकाल जाहिरात झाल्यानंतर 12 ऑक्टोबर,2017 रोजी विजयी मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भादवि कलम 188 नुसार शिक्षेस पात्र ठरेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment