Wednesday, October 4, 2017

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकी दरम्यान परवाना धारक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश



पुणे, दि. 4 : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पडण्यासाठी  अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र मुठे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 17 (3) (अे) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सार्वत्रिक व पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सदर आदेशाच्या दिनांकापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच 26/10/2017 अखेरपर्यंत स्वत: जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई केली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँकेची, संस्थांची व अधिकाऱ्यांची राहील.
            हा आदेश 26/10/2017 रात्री 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment