Tuesday, October 3, 2017

पंढरपूरला करणार स्मार्ट तीर्थक्षेत्र कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज् यांची ग्वाही




पंढरपूर दि. 3 :-  पंढरपूरचा विकास स्मार्ट तीर्थक्षेत्र म्हणून करुन अशी ग्वाही कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज् यांनी आज येथे दिली.
            कॅनडाचे कॉन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज् त्यांच्या सहकारी श्रीमती अँजेला शूवॉटर तारा  यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, चंद्रभागा नदीपात्र, मंदीर परिसराला भेट देऊन पाहणी केली.  त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजय देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार भारत भालके, यशोमती ठाकूर, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले आदी उपस्थित होते.
            कौन्सिल गव्हर्नर जॉर्डन रिव्हज म्हणाले, मी गेली दोन वर्षे भारतात आहे. पण पंढरपुरातील नागरिकांनी दिलेले प्रेम पाहून भारावून गेलो. येथे आल्यापासून लोक माझा सत्कार करत आहेत. मला भेटत आहेत. माझ्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा आहे.
            पंढरपूर अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॅनडा सरकार पंढरपुरला स्मार्ट तीर्थक्षेत्र करु इच्छित आहे. यासाठी येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, भाविक आणि सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल. स्मार्ट तीर्थक्षेत्र करण्यासाठी योग्य नियोजन आणि त्याचा आराखडा निश्चित केला जाईल, असे श्री. रिव्हज यांनी सांगितले.
            पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कॅनडा सरकारने दाखवलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या शहराचा विकास होणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी कॅनडा सरकारने उचललेले सकारात्मक पाउल अतिशय महत्वाचे आहे. विकासाच्या या पहिल्या पावलाचे रुपांतर विधायक आणि शाश्वत अशा कार्यात होईल्‍, असे त्यांनी सांगितले.
            यावेळी आमदार यशोधरा ठाकूर यांनी कौंडिण्यपूरचाही विकास करण्यासाठी कॅनडा सरकारने मदत द्यावी अशी मागणी केली. यावेळी आमदार भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांची भाषणे झाली.
            श्री. गहिनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एमडीसी कॉर्पोरेशनचे पुष्कर टापरे, पन्नीरसेल्वम् अरुमुगम,  प्रांताधिकारी विजय देशमुख, नगरपालिकेचे  मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, वारकरी संप्रदायातील महाराज व नागरीक उपस्थित होते.
तत्पुर्वी श्री. रिव्हज्, श्रीमती तारा आणि त्यांच्या सर्व सहका-यांनी श्री विठ्ठल-रक्मिणी यांचे दर्शन घेतले त्यांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली. मंदीरा पासून चंद्रभागा नदी पात्रापर्यंत चालत जाऊन पाहणी केली.
00000





No comments:

Post a Comment