Wednesday, October 4, 2017

झिरो पेन्डसीच्या अंमलबजावणीसाठी पुणे विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची शुक्रवारी कार्यशाळा


पुणे (विमाका) दि. 4 : पुणे विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची शुक्रवार दि. 6 आक्टोबर 2017 रोजी येथील विधान भवन सभागृहात सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली झिरो पेन्डसी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या एकदिवसीय कार्यशाळेला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपाधिक्षक, पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी, विभागातील सर्व जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरीकांची आणि प्रशासकीय कामे निर्गत करून लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी झिरो पेन्डन्सी अभियान विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, सहकार विभाग, जमाबंदी विभागात ‍झिरो पेन्डन्सी अभियान यशस्वी राबविल्यानंतर आता पुणे विभागातील सर्व महसूल कार्यालये, पुणे विभागातील जिल्हा परिषद, सर्व नगरपालिकांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. यानंतर आता पुणे विभागातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी पुणे विभागातील सर्व महसूल विभाग, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमुळे झिरो पेंन्डन्सी अभियानाला गती प्राप्त झाली होती.

No comments:

Post a Comment