Wednesday, October 4, 2017

परवानाधारकांनी शस्त्रे जमा करण्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश



पुणे, दि. 4 : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पडण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी सौरभ राव यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 17 (3) (अे) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी सादर केलेल्या यादीप्रमाणे व छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे एकूण 36 पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 475 शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
शस्त्रपरवानाधारकांनी त्यांचे परवान्यावरील शस्त्र जमा करणचे आदेश पोलीस विभागाने संबंधीत शस्त्र परवाना धारकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी बजवावेत. शस्त्रपरवाना धारकांनी अशा आशयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब व कोणत्याही परिस्थितीत सात दिवसाचे आत शस्त्र जमा करावीत. सदरचा आदेश पुणे ग्रमीण जिल्ह्यात दि.26/10/2017 अखेर अमलात राहील. तसेच दि. 26/10/2017 नंतर 7 दिवसांच्या आत संबंधितांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र परत करावेत. ज्या परवानाधारकांचे शस्त्र जमा करावयाचे आहे त्यांचे शस्त्रे जमा करुन ठेवण्याची योग्य ती व्यवस्था करावी. तसेच शस्त्रांना जमा कालावधीमध्ये कोणतेही नुकसान नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. शस्त्रे जमा करतांना ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment