Wednesday, October 4, 2017

प्रधानमंत्री पीक वीमा योजना तपशील जाहिर



पुणे, दि. 4 : प्रधान मंत्री पीक वीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत पीक वीमा योजना सन 2017-18 आंबिया बहारामध्ये फळपिकांना लागु करण्यात आली आहे.
            या योजनेचा उदेश कमी/जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व आर्द्रता या हवामान धोक्यापासुन निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे असा आहे पुणे जिल्ह्यातील पेरु, द्राक्षे, डाळींब, केळी, आंबा, लिंबु, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकासाठी सदर योजना इफको टोकीयो जनरल इंन्श्योरन्स कंपनीमार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे.
            या योजनेसाठी पुणे जिल्ह्याकरीता फळपिकनिहाय अधिसूचित तालुके पुढीलप्रमाणे आहेत. फळपिकनिहाय अधिसुचित महसुल मंडळामध्ये हि योजना राबविण्यात येणार असून त्याचा तपशिल पुढील प्रमाणे
अ.क्र
फळ पीक
तालुके
1
आंबा
दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापुर
2
डाळिंब
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरुर, हवेली
3
द्राक्षे
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर
4
केळी
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, खेड, हवेली, शिरुर
5
मोसंबी
इंदापुर
6
संत्रा
शिरुर
7
पेरु
बारामती, दौंड, हवेली, भारे, पुरंदर, शिरुर
8
लिंबु
शिरुर, बारामती, दौंड

कर्जदार/बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा प्रस्ताव बॅकांना सादर करण्याची अंतिम मुदत व प्रति हेक्टर विमा हप्ता पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र
पीक
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर
अंतिम मुदत
1
पेरु
2500/-
31 ऑक्टोबर
2
द्राक्षे
14000/-
15 ऑक्टोबर
3
डाळींब
5500/-
31 ऑक्टोबर
4
केळी
6000/-
31 ऑक्टोबर
5
आंबा
5500/-
31 डिसेंबर
6
लिंबु
3000/-
14 नोव्हेंबर
7
मोसंबी
3500/-
31 ऑक्टोबर
8
संत्रा
3500/-
30 नोव्हेंबर


सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना अनिवार्य असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत हवामानातील बदलामुळे म्हणजेच अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान, यामुळे फुलधारणा व फळ धारणेच्या कालावधीत होणाऱ्या संभाव्य नुकसानीस विमा संरक्षण देय राहील, योजनेमध्ये शेतकऱ्यांनी विमासंरक्षीत रकमेच्या केवळ 5 टक्के विमा हप्ता भरावयाचे आहे. या योजनेत नुकसान भरपाई महसुल मंडळस्तरावरील स्वंयचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार देण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्ताक्षेप राहणार नाही.
            अधिसुचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment