Monday, October 9, 2017

राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या नियामक समितीची बैठक संपन्न


पुणेदि. 9 : ग्रामिण भागाचा विकास करुन खेडेगांव स्मार्ट करण्याच्या उद्देशाने श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान राबविण्यात येतेया अभियानाच्या नियामक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालीबैठकीला आमदार बाबुराव पाचरणेअतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळेग्रामीण भागातील पदाधिकारीजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके उपस्थित होते.
            या बैठकीत राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत जिल्हयातील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.  लोणी काळभोर गांव समुहाअंतर्गत झालेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आलाविविध विकास कामांना यावेळी मान्यता देण्यात आली.,या अभियानात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवालप्रशासकीय मान्यतातांत्रिक मान्यता,निधीची उपलब्धताकामांची अंदाजपत्रकेवडगांवता.मावळ येथील एकात्मिक गावसमुह आराखडा यांचा आढावा बैठकीत घेण्यात आलाआमदार बाबुराव पाचरणे यांनी या अभियानातील विकास कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेराष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत मंजूर विकास कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केलीया बैठकीला लोकप्रतिनिधीगट विकास अधिकारीग्रामसेवक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment