Friday, September 1, 2017

‘संवादपर्व’ च्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत - तहसिलदार सुनील जोशी



राजगुरुनगर येथे संवादपर्व कार्यक्रम संपन्न
पुणे,दि. 1 : संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यत पोहोचत असून लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खेड तालुक्याचे तहसिलदार सुनील जोशी यांनी केले.
क्षेत्रिय प्रचार निदेशालय सूचना आणि प्रसारण मंत्रालय, अहमदनगर व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा राजगुरु महाविद्यालय, राजगुरुनगर येथे संवादपर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुरेश गोरे, केंद्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग, खेड तालुका शिक्षण प्रशासक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, बाळासाहेब सांडभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील, अहमदनगर क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये, प्राध्यापक रवी चौधरी उपस्थित होते.
तहसिलदार सुनील जोशी म्हणाले, राज्य शासन  राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. याद्वारे लोकांच्या विकासासह राज्य व देशाचा विकास होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी  योजनांची माहिती घेवून आपला सर्वांगीण विकास करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी राज्य शासनामार्फत प्रकाशित होत असलेले लोकराज्य मासिक विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याची माहिती दिली. तसेच सर्व विद्यार्थांना संवादपर्व कार्यक्रमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करुन यशस्वी कसे होता येईल याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी देखील संवादपर्व  उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमास मिलिंद भिंगारे, रोहित साबळे, सुगतकुमार जोगदंड, मोहन मोटे, सुर्यकांत कासार, तसेच हुतात्मा राजगुरु विद्ययालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000000




No comments:

Post a Comment