Monday, September 18, 2017

अनुदानातून नव्हे तर, योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन



सोलापूर दि. 17 :- सहकार क्षेत्रातील अवस्था जर बदलायची असेल तर सहकार क्षेत्रात अनुदानातून नव्हे तर, योगदानातून सहकार क्षेत्र सक्षम करा, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या, पुणे आयोजित राज्यतस्तरीय पणन व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यु.एस.इंदलकर, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, अटल महापणन विकास अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान ( उमेद) यांच्या सहकार्याने विविध महिला बचत गटांच्या स्टॉलचे उद्घाटन सहकारमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, व्यापाराचे अर्थकारण बदलल्यामूळे  सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या,विविध विकास सोसायट्या तसेच बाजार समित्या समोर आव्हाने आहेत.  त्यांना टिकावयाचे असेल तर त्यांनी मार्केटिंग व ब्रॅण्डींग करुन  वेगवेगळे प्रक्रिया उद्योग सुरु करुन आर्थिक परिस्थितीत सुधारावी लागेल.त्यांनी विविध महिला बचत गटांच्या माध्यमातील उद्योगांना एक बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचाही या माध्यमातून आर्थिक विकास करणे गरजेचे आहे. राज्य शासन विविध संस्थांचे संगोपन व बळकटीकरण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
यावेळी अटल महापणन विकास अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे, डॉ. आनंद जोगदंड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत यु.एस. इंदलकर यांनी केले.                                                                                                                       

0000


No comments:

Post a Comment