Monday, September 11, 2017

तालुकास्तरीय स्वच्छता पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन



पुणेदि.11: येथील नेहरू युवा केंद्राद्वारे  स्वच्छ भारत अभियान ग्रामस्वच्छता, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था व सामाजिक समूह यांच्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाबाबत तसेच जलयुक्त शिवार व  हागणदारीमुक्त शहर, तालुका, गाव व समुदाय इत्यादीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वच्छता  उपक्रमातून जसे गावामध्ये टॉयलेट निर्मितीसाठी सहकार्य, पाण्याच्या साधनांची दुरुस्ती, खेळाच्या मैदानाची दुरुस्ती, प्रत्यक्ष गाव आणि रस्त्यांची स्वच्छता मोहीम, पुतळे व किल्यांची स्वच्छता या क्षेत्रात काम केलेल्या संस्थांना प्रत्येक तालुक्यामध्ये दोन स्वच्छता पुरस्कार देण्यात येणार आहेत.
              पुरस्काराचे स्वरूप प्रथम पुरस्कार 8 हजार रुपये व मानपत्र तसेच व्दितीय पुरस्कार  4 हजार रुपये व मानपत्र असे 2015-16 या वर्षांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण प्रथम क्रमांकाचे 13 पुरस्कार व व्दितीय क्रमांकाचे 13 पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच सन 2016-17 या आर्थिक वर्षातही वरील प्रमाणे स्वच्छता पुरस्कार देऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा सम्मान 2 ऑक्टोबर 2017 रोजी करण्यात येणार आहे. पात्र संस्थांना विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 14 सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी वेबसाइट www.nyks.orgतसेच ई-मेल dyc.pune@gmail.com व कार्यालय दूरध्वनी क्र.                020-6055053  वर संपर्क साधावा,  अशी माहिती जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी  दिली आहे.
                                                                           0000

No comments:

Post a Comment