Friday, September 1, 2017

प्रवाशांनी शिवशाही बस सुविधेचा लाभ घ्यावा - पालकमंत्री विजय देशमुख


            सोलापूर दि. 01 : स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने सोलापूर शहरातुन राज्य परिवहन महामंडळातर्फे सोलापूर ते पुणे या मार्गावर अत्याधुनिकवातानुकुलीत शिवशाही  या बसचा शुभारंभ परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आला.
            येथील सोलापूर आगारातर्फे शिवशाही  बस सेवा आज सोलापूर एसटीबसस्थानकावरुन सुरु करण्यात आली असून या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्यासह एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.
            पालकमंत्री म्हणाले, शिवशाही वातानुकुलित बसमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच बसचे भाडेही प्रवाशांना परडेल इतकेच आकारण्यात आले आहे. शिवशाही बस सुविधेचा लाभ जिल्ह्यातील प्रवाशांनी घ्यावा. प्रवाशांना एसटीप्रवासदरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे अधिकाधिक सुविधा देण्याचे प्रयत्न असल्याचेही परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.
            शिवशाही बस सकाळी 6, वाजता सोलापूर येथून निघून ती पुणे येथे सकाळी 10.50 वाजता पोहोचेलतसेच सायंकाळी वाजता पुणे येथून निघून ती सोलापूर येथे रात्री11.05 वाजता पोहोचेलप्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार असल्याचेही परिवहन राज्यमंत्री  श्रीदेशमुख यांनी यावेळी सांगितले.
 विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी यावेळी या बस सेवेसाठी सोलापूर ते पुणे सुमारे 395/- रुपये इतके तिकीट दर असून प्रवाशी ऑनलाईन सुविधेचाही लाभ घेऊ शकतातसोलापूर-पुणे या प्रवासी मार्गावर प्रवाशांना वातानुकुलीत सेवा, तसेच आरामदायी आसनाची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
                                                            0          0          0          0          0

No comments:

Post a Comment