Friday, September 1, 2017

मुरघास निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूरदि. 1:- राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत बहुवर्षिय वैरण पिकांची  लागवड व उत्पादन करुन मुरघास  तयार करण्यासाठी जिल्ह्यातून इच्छूक शेतकऱ्यांडून अर्जाची मागणी करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी आपले अर्ज 29 सप्टेबर 2017 या कालावधीत तालुक्याच्या पंचायत समिती मधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे करावेत.
मुरघास तयार करणे योजनेंतर्गत जिल्ह्यात 5 मेट्रीक टन क्षमतेचे 32 व 10 मेट्रीक टन क्षमतेचे 32 युनिट असून त्यापैकी 16 टक्के अनुसूचित जाती, 8 टक्के अनुसूचित जमतीच्या लाभार्थीस युनिट देण्यात येतील. तसेच 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग लाभार्थिंनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बहुवर्षीय वैरण पिकाच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान विद्युतचलित कडबाकुट्टी साठी 50 टक्के तर मुरघास बांधकामासाठी 60 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येणार आहे.
योजेनच्या अधिक माहितीसाठी पंचायत समितीध्ये पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखना श्रेणी - 1/2  किंवा दूरध्वनी क्रमांक 0217 – 2342696 येथे संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा पशुसंर्धन अपआयुक्त, सोलापूर यांनी कळविले आहे.

*****

No comments:

Post a Comment