Sunday, June 7, 2020

पुणे विभागातील 7 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 12 हजार 214 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  पुणे दि. 7 :- पुणे विभागातील 7 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 हजार 214 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 262 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 253 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 523 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 936 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 409 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.33 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण  491 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 408, सातारा जिल्ह्यात 3, सोलापूर जिल्ह्यात  69, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर  जिल्ह्यात 6 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
  सातारा जिल्हयातील 621 कोरोना बाधीत रुग्ण असून 303  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या  292 आहे. कोरोनाबाधित एकूण 26  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सोलापूर जिल्हयातील 1263 कोरोना बाधीत रुग्ण असून 647 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 501  आहे. कोरोना बाधित एकूण  115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  सांगली जिल्हयातील 142 कोरोना बाधीत  रुग्ण असून 85 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 53  आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  कोल्हापूर जिल्हयातील 665 कोरोना बाधीत रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 238 आहे. कोरोना बाधित एकूण  8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 732 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 96 हजार 771 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 961 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 84 हजार 392 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 12 हजार 214 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
             
(टिप : - दि. 7 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
                                 0000

No comments:

Post a Comment