पुणे, दि. 07 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 805 क्विंटल अन्नधान्याची तर 23 हजार 616 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 5 हजार 743 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 9 हजार 818 क्विंटल इतकी झाली आहे
पुणे विभागात 6 जून 2020 रोजी 93.873 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.437 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 12.00 वा.पर्यंतची आहे )
0 0 0 0
No comments:
Post a Comment