Thursday, January 19, 2017

मेस्को करीअर अकॅडमी, सातारा येथे सैन्य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन


          पुणेदि.19 : महाराष्ट्र शासन अंगीकृत माजी सैनिक महामंडळ (मेस्को ) संचलित, मेस्को करीअर ॲकॅडमी, करंजे नाका, सातारा येथे सैन्य व पोलीस दल भरतीपुर्व प्रशिक्षण शिबीर चालविली जातात. यासाठी मैदानी व लेखी परिक्षेच्या तयारीची तसेच राहण्याची आणि जेवणाची  सुविधा उपलब्ध आहे. सैन्य व पोलीस भरती प्रक्रियेबददल मार्गदर्शन व शिबीरासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी मेस्को ॲकॅडमीचे प्रतिनिधी पुढील कार्यक्रमानुसार विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.
            अहमदनगर सैनिक मुलांचे वसतिगह, अहमदनगर  कॉलेजसमोर, चांदनी चौक, अहमदनगर  (संपर्क ०२५६२  २३७२३४) येथे सोमवार, दिनांक २३ जानेवारी, २०१७.  लातुर सैनिक मुलांचे वसतिगह, आंबेजोगाई रोड, मेडीकल कॉलेज समोर, लातुर  (संपर्क  ०२३८२  २२९००४) येथे मंगळवार २४ जानेवारी, २०१७.  उस्मानाबाद सैनिकी  मुलांचे वसतिगह, खाजा नगर, धाराशिव मंदिरासमोर, उस्मानाबाद  (संपर्क ०२४७२ - २५१२९१) येथे बुधवार २५ जानेवारी, २०१७ रोजी निवड चाचणीसाठी भेटी देणार आहेत.
           वरील प्रशिक्षण सर्व स्तरातील युवकांसाठी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी, वरीलपैकी त्यांच्या जवळच्या कोणत्याही निवड चाचणीच्या ‍ ठिकाणी सकाळी १० वाजता शैक्षणिक प्रमाण व गुणपत्रकासह उपस्थित रहावे. निवड चाचणीनंतर इव्छुक युवंकाना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. प्रवेश दिलेल्या युवंकानी प्रवेश शुल्क रक्कम रु २००/- त्वरित भरुन शिबीरातील आपला प्रवेश निश्चित करावा. उर्वरित रक्कम रु ६३००/- प्रवेशाच्या वेळी भरावी. अपरिहार्य कारणामुळे जे उमेदवार निवड चाचणीसाठी कोणत्याही ठिकाणी हजर राहु शकत नाहीत त्यांना मेस्को करिअर ॲकॅडमी, सातारा येथे येऊन थेट प्रवेश घेता येईल.
       अधिक माहितीसाठी सकाळी १० ते सांयकाळी ४ या वेळेत मोबाईल क्रंमाक ९१६८९८६८६४ किंवा ७५८८६२४०४३ वर संपर्क साधावा तसेच महाराष्ट्र्‍ माजी सैनिक महामंडळाचे ( मेस्को )  संकेत स्थळ www.mescoltd.co.in भेट द्यावी असे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बिपिन शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                 0000

No comments:

Post a Comment