Friday, January 6, 2017

डीजीधन मेळाव्याला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन





डीजीधन मेळाव्याला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन

            पुणेदि07 (विमाका) रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करुन डिजीटल अर्थप्रणालीला चालना देण्यासाठीच्या उपक्रमांतर्गत आज येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात डिजीधन मेळाव्याला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात झाली. पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
            याप्रसंगी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            डिजीधन मेळाव्याचे आयोजन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व बँकानी संयुक्तपणे केले आहे. मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक, हस्तकला, कपडे, खाद्यपदार्थ आदि विविध वस्तूंच्या तसेच बचत गटांचे व विविध बँका,आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र यांच्या सेवांचा समावेश असलेल्या ६० स्टॉल्सची उभारणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहेत. बँकांचे नवीन खाते उघडणे, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक संलग्न करणे आदी विविध सेवा देण्यात येणार आहेत.
            या मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सीस बँक, बचत गट आदी स्टॉलला पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली. तसेच रोखरहित व्यवहारासाठी अंमलात येणाऱ्या विविध सेवांची तसेच मोबाईल अॅपची माहिती घेतली. रोखरहित व्यवहारासाठी भावी काळातील उपक्रमांची माहिती सुद्धा त्यांनी घेतली.
000

No comments:

Post a Comment