Friday, January 6, 2017

“तुम्ही शिका दुसऱ्यांना शिकवा” पालकमंत्र्यांनी दिला युवकांना मंत्र







पुणे दिरोखरहित अर्थव्यवस्था काळाची गरज आहेया नव्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी युवकांनी स्वतरोखरहित अर्थव्यवस्था शिकून इतरांनाही ती शिकवावी असा मंत्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी  आज युवकांना दिला.
        येथील एस.पीकॉलेजवर सुरु असणाऱ्या डिजी धन मेळाव्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी युवकांशी संवाद साधत त्यांना रोखरहित व्यवहारा विषयी मार्गदर्शन केले.
        पालकमंत्री गिरीश बापट म्हणालेसमाजातील सर्व घटकांना रोखरहित अर्थव्यवस्थेची ओळख होणे आवश्यक आहेरोखरहित अर्थव्यवस्था ही उद्याच्या  अर्थक्रांतीची नांदी आहे.यामुळे काळे धन बाहेर येवून समाज भ्रष्टाचारमुक्त होण्यास मदत होणार आहेया नव्या अर्थक्रांतीच्या चळवळीत युवकांचा सहभाग महत्वाचा आहेया नव्या चळवळीला गती देण्यासाठी युवकांनी स्वत:याचे धडे घ्यावेत आणि समाजातील सर्व घटकांमध्ये याची जागृती करण्याचा सल्ला दिला.
******

No comments:

Post a Comment