Monday, October 15, 2018

पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


वृ.वि.3380                                             23 आश्व‍िन 1940(सायं. 6.45)
दि. 15ऑक्टोबर,2018
पोलिसांनी नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· जिल्हा कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा
· कायद्याचे राज्य निर्माण करावे


· जिल्ह्याचे गुन्हा सिद्धीचे प्रमाण वाढले
· जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस वसाहतींना मान्यता
बुलडाणा, दि. 15 : राज्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. या जबाबदारीचे भान ठेऊन पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण करावा. सामान्य जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री मदन येरावार, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ आदी उपस्थित होते.
पोलिसांनी गुन्हेगारी सिद्धतेमध्ये येत असलेल्या त्रृटी दूर करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांवर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची सामाजिक जबाबदारी आहे. तपासात गुणवत्ता वाढविण्यात यावी. राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तपास करावा. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयातील सरकारी अधिवक्त्याचा सल्ला घ्यावा. तसेच अवैधधंद्यांवर कडक कारवाई करावी. महिलांविरुध्दच्या गुन्ह्यांचा तपास काळजीपूर्वक करावा.
गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार आणि तक्रारदार फितूर होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. फितूर झाल्यास संबंधितावर धोखाधडीचा गुन्हा दाखल करावा. तसेच न्यायालयात अर्ज दाखल करावा, निवाड्याच्या वेळी या अर्जाचा उल्लेख करण्याची विनंती करावी. चोरीच्या प्रकरणांमध्ये तपास लागत नाही, असा नागरिकांचा समज आहे, तो दूर करावा. बुलडाणा येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय सुमारे शंभर वर्षे जुने आहे. या कार्यालयाच्या इमारती सोबतच पोलिसांसाठी बुलडाणा येथे १२५ घरे प्राधान्याने बांधण्यात येतील. गुन्हे सिद्धतेचे जिल्ह्याचे प्रमाण चांगले आहे. ते आणखी वाढविण्यात यावे.
बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांनी सादरीकरण केले. यावेळी पोलीस स्टेशननिहाय विविध गुन्हे प्रकारांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक,  उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन अधिकारी, पोलीस निरीक्षक, सरकारी वकील आदी उपस्थित होते.
००००


वृ.वि.3371                                             23 आश्व‍िन 1940(दु. 3.00)
दि. 15ऑक्टोबर,2018
मंत्रालयामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
मुंबई, दि. 15 : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते, उपसचिव प्रशांत मयेकर आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000
वृ.वि.3369                                           23 आश्व‍िन 1940(दु. 2.25)
दि. 15ऑक्टोबर,2018
राज्यात आज साजरा झाला वाचन प्रेरणा दिन
मराठी भाषा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत
मंत्रालयात वाचनतास उपक्रम संपन्न
मुंबई, दि. 15 : वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागंणात मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वाचनतासया उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचनतासउपक्रम झाला.श्री.तावडे यांनी यावेळी उपस्थित वाचकांबरोबर श्रोतेहो ! या पु.ल.देशपांडे यांच्या  भाषणांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे वाचन केले.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. 15 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
पोलीस चौकीमधील वाहतूक पोलीसांना पुस्तक भेट
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने श्री. तावडे यांनी गिरगाव आणि मरीन लाईन्स येथील पोलीस चौकी मधील वाहतूक पोलीसांना पुस्तक भेट दिली. पोलीसांनी सुध्दा स्वत:साठी वेळ काढून विविध पुस्तकांचे वाचन करावे, असे श्री. तावडे यांनी यावेळी येथील पोलिसांना सांगितले.
एस एल ॲन्ड एस एस गर्लस् हायस्कुलला भेट
मराठी भाषा मंत्री श्री. तावडे यांनी चर्नी रोड येथील एस एल ॲन्ड एस एस गर्लस् हायस्कुलला भेट दिली. यावेळी मुंबई परिसरातील विविध शाळांतील मुले उपस्थित होती. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने या शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत श्री. तावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.
आजच्या काळातही पुस्तक वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देताना श्री.तावडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येणे अभ्यास करणे हे महत्वाचे असले तरी अभ्यासासोबत अवांतर पुस्तके पण वाचा त्यातून तुम्हाला आनंद आणि ज्ञान मिळेल, असे सांगितले. अभ्यास, शाळा यामधून थोडा तरी वाचनासाठी वेळ काढा.शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिन्यातून एक पुस्तक तरी वाचले पाहिजे. वाचनाची आवड तुम्हाला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसारखे प्रतिभावंत करेल असे सांगितले.
0000

वृ.वि.3370                                             23 आश्व‍िन 1940(दु. 2.25)
दि. 15ऑक्टोबर,2018
गुणवंत मुलामुलींना उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 15: उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी टीएचई (Times Higher Education) किंवा क्युएस (Quacquarelli Symonds) रँकीग 200 च्या आतील विविध देशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा 20 विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून दरवर्षी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ मंजूर करणे या नावाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात येणार आहे.
विविध शिक्षण शाखेनुसार विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थी संख्या कला शाखा- 2, वाणिज्य शाखा- 2,विज्ञान शाखा-2, व्यवस्थापन शाखा-2, विधी अभ्यासक्रम-2, अभियांत्रिकी/वस्तू कला शास्त्र -8 आणि औषधनिर्माणशास्त्र-2 अशी असून या प्रमाणेविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनामार्फत 20 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे, आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर कोणत्याही पध्दतीने केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही.
संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आणि आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्र अर्जासोबत अपलोड करणे यासाठी 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी तंत्र शिक्षणचे विभागीय कार्यालय यांना 19 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2018 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)जमा करणे आवश्यक आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबरोबरच विभागीय कार्यालय, उच्च शिक्षण व विभागीय कार्यालय आणि तंत्र शिक्षण यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
००००


माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार
-  संभाजी पाटील निलंगेकर
मुंबई, दि. 15: माजी सैनिक, त्यांच्या विधवा आणि पाल्य यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.
माजी सैनिकांच्या तक्रारी व समस्यांबाबत समजून घेण्याबाबत राज्य माजी सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिक कल्याणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्यासह माजी सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व माजी सैनिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सूचना जाणून घेऊन, माजी सैनिकांच्या पाल्यांना वाढीव वसतीगृह भत्ता देण्यासाठी प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे सांगून श्री. निलंगेकर म्हणाले, माजी सैनिक संघटनांमार्फत विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन समस्या सोडविल्या जातील.
००००

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि
रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा
- सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 15 : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा, ते सर्वोत्तम होईल याची काळजी घ्या, अशा सूचना वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
आज सह्याद्री अतिथीगृहात श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार विकास महात्मे,  भारत सरकारची कंपनी एच. एस. सी. सी . चे अधिकारी, सार्वजनिक  बांधकाम, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासदारश्री. महात्मे यांच्याकडून अद्ययावत
रुग्णवाहिकेसाठी 25 लाख रु चा निधी
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी करता यावी यासाठी  खासदारश्री. महात्मे यांनी खासदार निधीतून  25 लाख रु. चा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी त्यांना  धन्यवाद दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी सुधारित 973 कोटी रु. च्या बांधकाम आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि रुग्णालयाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातील जनतेला ही आरोग्याच्या उत्तम सुविधा उपलब्ध होतील, नागरिकांची ही गरज ओळखून रुग्णालयाचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारत सरकारच्या एच.एस.सी.सी. इंडिया लि. ची निवड करून त्यांच्याकडे हे काम सोपविण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने या कंपनीसमवेत सामंजस्य करार केला आहे, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
००००


'जय महाराष्ट्र' मध्ये गृहविभागाचे प्रधान सचिव
अमिताभ गुप्ता
मुंबई, दि.१५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्यातील कायदा व सुव्यवस्थाया  विषयावर गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. श्रीमती अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
             राज्यात सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजन, अफवांना बळी पडून होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर नियंत्रणासाठी पोलीस विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, सोशल मीडियावर अफवा पसरविणा-यांवर करण्यात येणारी कारवाई, राज्यातील महिला, बालके आणि वृध्दांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, सामाजिक ऐक्य व शांतता राखण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच गावस्तरावर केले जाणारे प्रयत्न, ट्रान्सफॅार्म महाराष्ट्र  संकल्पना याबाबतची माहिती श्री. गुप्ता यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
००००



मुंबईतील आदिवासी पाड्यांचे
प्रश्न तातडीने मार्गी लावावेत
- आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा
मुंबई, दि. 15 : मुंबई येथील 100 वर्ष जुन्या आदिवासी पाड्यांचे प्रश्न तेथील समस्या याबाबत सर्व संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन ते मार्गी लावावेत, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे दिले. या संदर्भातील मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग यांनी संयुक्तपणे सर्वेक्षणाची मोहीम राबवावी. येथील रहिवाश्यांना जातीचे प्रमाणपत्र, ते कसत असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाच्या नोंदी तसेच प्राथमिक शाळा, दवाखाना आदी बाबतच्या सर्व सोयी सुविधा महानगरपालिका व इतर संबंधित यंत्रणेने देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही श्री. सवरा यांनी यावेळी सांगितले.
आदिवासींची पाडलेली घरे, जामदार पाडा येथील विहिर, बोरीवली येथील तलावात झालेले अतिक्रमण यासंदर्भातही सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. मुंबई बोरीवली येथील गोराई मनोरी मालाड भागातील जवळपास 15 आदिवासी पाड्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच पाड्याचे आदिवासी बांधव, प्रतिनिधी उपस्थित होते.
००००


वृ.वि.3376                                             23 आश्व‍िन 1940(सायं. 6.00)
दि. 15ऑक्टोबर,2018
पालघर येथील शासकीय कार्यालयाच्या
बांधकामाचा वेग वाढवावा
- विष्णू सवरा
 मुंबई, दि. 15 : सिडकोच्या माध्यमातून पालघर येथे नवनगर निर्माण करताना तेथील महत्वाच्या शासकीय इमारती मार्च 2019 अखेर सर्व सोयी सुविधायुक्त पूर्ण करण्यासाठी बांधकामाचा वेग वाढवावा.तसेच जिल्हा नियोजन भवनाचे काम महत्वपूर्ण असून त्याबाबत विशेषत्वाने लक्ष द्यावे.  असे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे दिले.
यासंदर्भातील एक आढावा बैठक मंत्री श्री. सवरा यांच्या दालनात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, विभागाचे सह सचिव सुनील पाटील तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिडकोच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या नवनगरच्या बांधकामाबाबत मंत्री श्री. सवरा यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीस उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम सुरु करावे. नागरिकांच्या महत्वाच्या अशा दैनंदिन गरजेच्या तहसिल, प्रांत कार्यालयाचे बांधकाम देखील सुरु करावे, असे श्री. सवरा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मार्च 2019 अखेर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय किमान तळ व पहिला मजला सहित पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सिडको, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, पोलीस प्रशासन, नगरपरिषद व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांना गती
पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहाच्या अपूर्ण बांधकामाबद्दलही आढावा बैठक श्री. सवरा यांच्या दालनात झाली.
यावेळी पालघर जिल्ह्यात 20 ठिकाणी नवीन आश्रमशाळांना जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणचे बांधकाम सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. विभागामार्फत बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींचे हस्तांतरण विभागाकडे करावे. ऑक्टोबरअखेर तयार झालेल्या आश्रमशाळांचे उद्घाटन व प्रस्तावित आश्रमशाळांचे भूमिपूजन कसे होईल हे पहावे, असे निर्देश श्री. सवरा यांनी दिले.
००००


वृ.वि.3377                                            23 आश्व‍िन 1940(सायं. 6.00)
दि. 15ऑक्टोबर,2018
सिडको ने  720 कोटी रु चा चिखलदरा
एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्धरितीने पूर्ण करावा
- सुधीर मुनंगटीवार
मुंबई, दि. 15 :  प्लॅनिंग, क्वॉलिटी आणि स्पीड या  पी.क्यू.एस सूत्राचा उपयोग करून सिडकोने  720 कोटी रु चा चिखलदरा एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्धरितीने पूर्ण करावा, असे  निदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.  
आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस  अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार आनंदराव आडसूळ, आमदार प्रभूदास भिलावेकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, सिडको चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, एम.टी.डी.सी चे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे, अमरावतीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते
चिखलदरा हे विदर्भातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून पर्यटनाच्यादृष्टीने या स्थळाचे विशेष महत्व आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथे  वर्षभरात साधारणत: दीड लाखापर्यंत पर्यटक भेट देतात. पर्यटनाच्यादृष्टीने चिखलदऱ्याचे असलेले महत्व लक्षात घेऊन  शहराचा विकास करण्यासाठी सिडको आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकास आराखडा राबविला जात आहे. त्यात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये पर्यटक निवास, नेचल ट्रेल, मचान, साहसी क्रीडा संकूल,  तेथील पर्यटन पॉईंटसचा विकास, यासारख्या कामांचा समावेश आहे.
आराखड्यात चिखलदरा येथे मालविय पाँईंट ते भीमकूंड-एनर्जी पॉईंट पर्यंत अंदाजे १.५ कि.मी  लांबीचा आणि खोल दरीतून जाणारा रोप-वे, हरीकेत ते शिवसागर पॉईंट पर्यंत ५०० मीटरचा स्काय वॉक देखील प्रस्तावित करण्यात आला आहे.  हे काम पर्यटन विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी लागणारी एक कोटी रुपयांची रक्कम येत्या विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिली जाईल असे श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. गावीलगड किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटक सुविधा केंद्र बांधण्याचे प्रस्तावित आहे. सर्व व्ह्यू पॉईंटना जोडणारा २७ कि.मी. लांबीचा आणि १२ कि.मी. रुंदीचा गोलमार्गही (रिंगरोड) या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. याच्या भूसंपादनाचे काम सुरु आहे.
अर्थमंत्री पुढे म्हणाले की, मानव विकास कार्यक्रमांतर्गत चिखलदऱ्याचा समावेश आहे.  येथील मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि दरडोई उत्पन्न यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत.  यातून तिथे रोजगार निर्मितीचे उपक्रम राबविले जावेत, असेही ते म्हणाले.
००००


वृ.वि.3378                                            23 आश्व‍िन 1940(सायं. 6.25)
दि. 15ऑक्टोबर,2018
न्यायाधीन बंदी सुनील जाधव यांच्या मृत्यूची
31 ऑक्टोंबर रोजी दंडाधिकारी चौकशी

मुंबई, दि. 15 : मुंबई मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंदी क्र. 479/17 सुनील परशुराम जाधव हे पोलीसांच्या रखवालीत मृत्यू पावले आहेत. या घटनेची दंडाधिकारी चौकशी बुधवार दि. 31 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी 2.00 वा करण्यात येणार आहे. ही चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय, दंडाधिकारी शाखा, तळ मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई 400001 या ठिकाणी होणार आहे. या घटनेसंदर्भात कोणास म्हणणे मांडायचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर चौकशीच्या वेळी सादर करावे, असे आवाहन मुंबई शहराच्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी केले आहे.
०००


वृ.वि.3379                                             23 आश्व‍िन 1940(सायं. 6.45)
दि. 15ऑक्टोबर,2018
बुलढाणा जिल्ह्यात २००० शेततळ्यांची निर्मिती करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यातील विविध विषय व पीक पाणी परिस्थितीची आढावा बैठक
प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवारमधील उर्वरित कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे निर्देश
जिगांव प्रकल्पासाठी १५०० कोटी रूपये, निधी अभावी प्रकल्पाचे काम थांबणार नाही
बुलडाणा, दि. १५ : जिल्ह्याचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या जिगांव सिंचन प्रकल्पासाठी १५०० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्ह्यात आणखी २ हजार शेततळ्यांची निर्मिती करण्यात येईल आणि सीड हबसाठी २०० शेडनेट उभारण्यास मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यातील पीक पाणी परिस्थिती, शासनाच्या प्राधान्यक्रम योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था या बाबींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा उमा तायडे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, राहुल बोंद्रे, ॲड.आकाश फुंडकर, डॉ. शशिकांत खेडेकर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पीयुष सिंग, जलसंपदा विभागाचे सचिव अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदी उपस्थित होते. तसेच मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी सर्वांसाठी घरे २०२२ पर्यंत उपलब्ध करुन देण्यासाठी नागरी भागातील घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्याला नागरी भागात असलेले सुमारे २० हजार ९६९ घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल. जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन ज्या ठिकाणी लाभार्थी राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना घरकूल देण्यासाठी प्रयत्न करावेत. या योजनांचा पुढील दोन महिन्यानंतर पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार पट्टे वाटप करण्यात यावे.
मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्याला ५ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ७७२ शेततळी पूर्ण केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्याने शेततळ्यांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी ४ हजार २०५ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. येत्या काळात शेततळ्यांची अतिरिक्त मागणी घेऊन २००० शेततळ्यांच्या उद्दिष्टाला मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच धडक सिंचन विहिरी, जलयुक्त शिवार यामध्ये देखील जिल्ह्याचे काम प्रशंसनीय आहे. ज्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी जलसंधारणाच्या अतिरिक्त कामाचे नियोजन करावे. तसेच ही कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात २० जेसीबी आणि ३० पोकलॅंड अशा ५० मशीन उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पावसाच्या खंडाच्या काळात सिंचनासाठी झालेला लाभ तपासण्यात यावा.
मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांमधून चांगले कर्ज वितरण जिल्ह्यात झाले आहे. मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी संकलित करावी. लाभार्थ्यांच्या यशोगाथा जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसारित कराव्यात. या वर्षापासून शिष्यवृती ही महाडीबीटी अंतर्गत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन करण्यात येणार नाही. या पोर्टलवर महाविद्यालयांनी नोंदणी करावी, जे महाविद्यालय नोंदणी करणार नाही, त्यांना नोंदणीसाठी बाध्य करण्यात यावे. महाडीबीटी पोर्टलवरील ऑनलाईन अर्जाच्या मंजुरीमध्ये येणाऱ्या त्रृटी तपासण्यात याव्यात. ऑनलाईन प्रक्रियेमुळे लाभ प्रलंबित राहत नाही. ही बाब महाविद्यालयांच्या लक्षात आणून द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम गतीने होणे गरजेचे आहे. पुढील वर्षाच्या उद्दिष्टीत कामांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे २०१९-२० च्या कामांची निविदा प्रक्रिया नोव्हेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.
देऊळगांव राजा तालुक्यात बिजोत्पादन उपक्रमाकरिता २०० शेडनेटची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करून हा रोजगारक्षम उपक्रम पूर्ण करण्यात यावा. जिल्ह्यात अल्प पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे खडकपूर्णासह अन्य प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी करावा. सिंचनासाठी आरक्षित पाणी न ठेवता पिण्यासाठी राखीव ठेवावे. अवैधरित्या होणारा पाण्याचा उपसा रोखण्यासाठी कारवाई करावी. जिगांव प्रकल्पासाठी राज्य शासन या वर्षात १५०० कोटी रूपये देत आहे. त्यामुळे निधीअभावी या प्रकल्पाचे काम निश्चितपणे थांबणार नाही. टंचाई परिस्थिती जाहिर करण्याच्या टप्प्यामध्ये पाहिले दोन टप्पे वैज्ञानिक निकषांवर आधारित आहेत. त्यामुळे पीक कापणी अहवालामध्ये जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून हे काम व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न करावे. दुष्काळी परिस्थिती जाहिर करण्यासाठी लागणारी माहिती केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. मदत मिळण्यासाठी पीक कापणी अहवाल योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे व जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी सादरीकरण केले.
0000


मंत्रालयमें डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम को  अभिवादन
मुंबई, दि. 15 : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम की जन्मतिथि के अवसर पर  शिक्षा मंत्री विनोद तावडे द्वारा  मंत्रालय में मौजूद श्री कलाम की प्रतिमाँ पर  पुष्पमाला और  फुल चढ़ाकर उन्हें याद किया गया |  इस अवसर पर  सामान्य प्रशासन विभाग के  अतिरिक्त मुख्य सचिव श्री बिपीन मल्लिक, मुख्यमंत्री के प्रधान सचिव श्री भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागा की  उपसचिव श्रीमती छाया वडते, उपसचिव श्री प्रशांत मयेकर इत्यादि के साथ  मंत्रालय के अधिकारी तथा  कर्मचारी मौजूद थे |
००००
राज्य में आज मनाया गया पढ़ाई प्रेरणा दिन
मराठी भाषा मंत्री के उपस्थिति में
मंत्रालय में 'वाचनतास' अभियान संपन्न
मुंबई दि. 15 :पढाई प्रेरणा दिन के औचित्य पर मंत्रालय में त्रिमूर्ति प्रांगण में मंत्रालय के सभी विभागों के अधिकारी एवं कर्मचारियों के लिए 'वाचनतास' इस अभियान का आयोजन किया गया था। इस समय मराठी भाषा मंत्री विनोद तावडे के प्रमुख उपस्थिती में 'वाचनतास' इस अभियान का आरंभ हुआ। श्री. तावडेजी ने इस समय उपस्थित पढ़ाई करने वालों के साथ श्रोतेहो!  पु. ल. देशपांडे इनके भाषण का संकलन  इस किताब की पढ़ाई की।
            भारत के पूर्व राष्ट्रपति भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इनके जन्मदिन, दि. 15 अक्टूबर को पुरे देश में पढ़ाई प्रेरणा दिन मनाया जाता है। पिछले तीन सालों में इस दिन को लोकाभिमुख संकल्प का स्वरूप प्राप्त हुआ है।
पुलिस चौकी के यातायात पुलिसों को किताबों की भेंट।
पढ़ाई प्रेरणा दिन के औचित्य पर श्री. विनोद तावडे इन्होंने गिरगाव और मरीन लाईन्स याहां के पुलिस चौकी के पुलिसकर्मियों को किताबों की भेंट दी। पुलिसों ने भी खुद के लिए समय निकाल कर विभिन्न किताबों की पढना चाहिए, यह भी श्री. तावडे इन्होंने इस समय याहां के पुलिसों को बताया।
एस एल अ‍ॅण्ड एस एस गर्ल्स हायस्कूल का किया दौरा।
मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे इन्होंने चर्नी रोड याहां के एस एल अ‍ॅण्ड एस एस गर्ल्स हायस्कूल का दौरा किया। इस समय मुंबई प्रांत के विभिन्न स्कूलों के बच्चे उपस्थित थे। पढ़ाई प्रेरणा दिन हेतु इस स्कूल में खास कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के दौरान श्री. विनोद तावडे ने स्कूलों के छात्रों से बातचीत की।
आज के परिवेश में किताबों की पढ़ाई का महत्व समझाते हुए श्री. विनोद तावडे इन्होंने छात्रों को स्कूल में आने के साथ-साथ, पढ़ाई करना यह जितना जरूरी है उतना ही अन्य किताबें पढ़ना, और इसके कारण आपको आनंद भी मिलेगा और ज्ञान भी, यह भी बताया। स्कूल की पढ़ाई में से थोड़ा बहुत समय अन्य किताबों की पढ़ाई के लिए भी निकालें। स्कूल में जानेवाले छात्रों ने महीने में कम से कम एक किताब को पढना जरूरी है। पढाई की आकांक्षा आपको डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम के जैसे प्रतिभाशाली बनायेगी यह भी बताया।
००००


मेधावी बच्चों के लिए उच्च शिक्षा विभाग की छात्रवृत्ति
ऑनलाइन छात्रवृत्ति के लिए आवेदन करने की अपील

मुंबई, 15 अक्टूबर: उच्च और तकनीकी शिक्षा विभाग खुली श्रेणी  मेधावी छात्रों को उच्च शिक्षा विभाग की छात्रवृत्तियां देगा। स्नातकोत्तर, स्नातकोत्तर डिप्लोमा और पीएचडी पाठ्यक्रम के लिए टीएचई (Times Higher Education) अथवा क्यू एस (Quacquarelli Symonds)
 रैंकिंग 200 के भीतर विभिन्न देशों के विभिन्न शैक्षणिक संस्थानों में भर्ती हुए 20 मेधावी छात्रों को छात्रवृत्ति देने के लिए निर्णय लिया गया है।
यह योजना शैक्षिक वर्ष 2018-19 से विदेश में "उच्च शिक्षा के लिए मेधावी छात्रों के लिए छात्रवृत्ति" देने के नाम पर उच्च और तकनीकी शिक्षा विभाग के तहत लागू की जाएगी।
विभिन्न शिक्षा शाखाओं के मुताबिक, छात्रों के लिए छात्रवृत्तियां, अर्थात् कला -2, वाणिज्य -2, विज्ञान -2, प्रबंधन -2, कानून -2, इंजीनियरिंग / वास्तुकार -8 और फार्मास्यूटिकल्स -2 प्रदान की जाएंगी।
इस वित्तीय वर्ष में इस योजना के लिए राज्य सरकार को 20 करोड़ रूपये उपलब्ध कराए गए हैं। इस योजना के तहत छात्रों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं। इच्छुक छात्रों को www.dtemaharashtra.gov.in पर ऑनलाइन फॉर्म भरना होगा , आवेदन के साथ आवश्यक प्रमाणपत्र / दस्तावेज अपलोड करें। ऑनलाइन आवेदन को छोड़कर कोई अन्य आवेदन नहीं माना जाएगा।
छात्रों को वेबसाइट पर 15 अक्टूबर से 30 अक्टूबर 2018 (5 बजे) तक आवश्यक प्रमाणपत्र / दस्तावेजों के साथ आवेदन पत्र भरना होगा। भरे हुए आवेदन पत्र की एक प्रति, मूल प्रमाणपत्रों के सत्यापन के लिए संबंधित विभागीय कार्यालय में प्रमाणित प्रति के साथ आवश्यक प्रमाण पत्र / दस्तावेज जमा किए जाने चाहिए। कला, वाणिज्य, विज्ञान और कानून पाठ्यक्रम के अभ्यर्थियों को उच्च शिक्षा विभाग के विभागीय कार्यालय में और प्रबंधन, इंजीनियरिंग / वास्तुकला और फार्मास्यूटिकल कोर्स के लिए तकनीकी शिक्षा विभाग के कार्यकाल में 1 9 अक्टूबर से 6 नवंबर 2018 (5.00 बजे) तक प्रस्तुत किया जाना चाहिए।
यह सरकारी आदेश महाराष्ट्र सरकार की वेबसाइट  www.dtemaharashtra.gov.in पर तथा निदेशालय की वेबसाइट  www.maharashtra.gov.in पर उपलब्ध है।  इसके अलावा, वेबसाइट पर तकनीकी शिक्षा और उच्च शिक्षा के विभागीय कार्यालयों की सूची उपलब्ध की गई है।
0000


चंद्रपुर मेडिकल कॉलेज एवं अस्पताल का काम गतिमानता से पूर्ण करें
- श्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, अक्टूबर 15 :- चंद्रपुर मेडिकल महाविद्यालय तथा अस्पताल का काम गति के साथ पूरा करें तथा इस बात को ध्यान रखें कि यह अस्पताल एक सबसे अच्छा अस्पताल बनकर सामने आए,  यह सूचना वित्त मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने दी आज सहयाद्री अतिथि गृह में दी.
            आज श्री मुनगंटीवार की अध्यक्षता में चंद्रपुर के मेडिकल कॉलेज तथा महाविद्यालय की समीक्षा बैठक आयोजित की गई थी इस अवसर पर में बोल रहे थे. बैठक में सांसद विकास महात्मे, भारत सरकार की कंपनी एच एस सी सी के अधिकारी, सार्वजनिक निर्माण काम तथा मेडिकल शिक्षा विभाग के अधिकारी उपस्थित थे. इस सरकारी मेडिकल महाविद्यालय तथा अस्पताल के निर्माण कार्य के लिए सुधारित 973 करोड़ के निर्माण काम की रूपरेखा को तत्वत: मान्यता दी गई है. इस मेडिकल कॉलेज तथा अस्पताल का काम अच्छी तरह से पूरा किया जाता है तो जिला ही नहीं बल्कि विदर्भ संभाग की जनता को स्वास्थ्य संबंधी सुविधाएं उपलब्ध कराने में मदद होगी, यह सुझाव देते हुए श्री मुनगंटीवार ने कहा कि सामान्य नागरिकों की आवश्यकता के मद्देनजर इस अस्पताल के निर्माण काम को गतिमान तरीके से पूरा होना आवश्यक है. इसके लिए भारत सरकार ने एचएससीसी इंडिया लिमिटेड का चयन किया है और उन्हें यह जवाबदेही सौंपी है. मेडिकल शिक्षा विभाग ने इस कंपनी के साथ समझौते पर हस्ताक्षर किये है, ऐसा भी श्री मुनगंटीवार ने कहा.
सांसद महात्मे ने दिए एंबुलेंस के लिए 25 लाख
            चंद्रपुर के सांसद श्री महात्मा ने चंद्रपुर के सरकारी मेडिकल महाविद्यालय और अस्पताल को आधुनिक एंबुलेंस खरीदी करने के लिए सांसद निधि से 25 लाख रुपए दिए हैं. इसके लिए श्री मुनगंटीवार ने उनको धन्यवाद दिया.
००००




No comments:

Post a Comment