Monday, October 8, 2018

बदलत्या महाराष्ट्राचे लोकराज्यमध्ये प्रतिबिंब पालकमंत्री विजय देशमुख यांचे प्रतिपादन

सोलापूर दि.  8 :- राज्य शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमधून महाराष्ट्रात सकारात्मक बदल होत आहे. या बदलाचे प्रतिबिंब लोकराज्यच्या विशेषांकात पहावयास मिळते, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज येथे केले.
      माहिती व जनसंपर्क महासंचालनालनाच्यावतीने ऑक्टोबर महिन्याच्या महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या अंकाचे स्थानिकरित्या प्रकाशन पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगले, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनिल रावडे, सहाय्यक वितरण अधिकारी रमा जोशी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, माहिती सहाय्यक एकनाथ पोवार उपस्थित होते.
      पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राज्यात अनेक विकास योजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनाच्या लाभामुळे सामान्यांच्या जीवनात आता परिवर्तन घडत आहे. शासकीय योजनांच्या लाभामुळे होणारे परिवर्तन इतरांना प्रेरणा देण्यासाठी लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने परिवर्तनाच्या कथेव्दारे आणले, हा माहिती व जनसंपर्कचा स्तुत्य उपक्रम आहे’.
      यावेळी सोलापूर शहरातील 315 रेशन दुकानदारांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार करण्यात आले. 315 लोकराज्य वर्गणीदारांची यादी व  वर्गणीची रक्कम पालकमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब गंदगे, पदाधिकारी हर्षल गायकवाड, सचिव सुनिल पेंटर यांनी जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांच्याकडे सुपूर्द केली.


No comments:

Post a Comment