Monday, October 1, 2018

गोवर-रुबेल अभियान प्रभावीपणे राबवा अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या सूचना

गोवर-रुबेल अभियान प्रभावीपणे राबवा  अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या सूचना

सोलापूर, दि. 1- केंद्र सरकारचे गोवर रुबेला लसीकरण अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात आज लोकशाही दिन झाला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या वतीने राज्यात सर्वत्र हे अभियान राबविण्यात येणार आहे. 27 नोव्हेंबर ते 31डिसेंबर 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अभियान जिल्ह्यातील  सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचबरोबर विविध सामाजिक ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे. नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील  जिल्ह्यातील सुमारे वीस लाख मुलां मुलींना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिका आणि महिला बालकल्याण विभागाने मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे प्रमाणेच या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. ज्योती लांडगे  यांनी गोवर-रुबेला अभियान बाबत सादरीकरण केले.
            दरम्यान, आपले सरकार पोर्टल वरील तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात यावे, अशा सूचना श्री. शिंदे यांनी दिल्या.   बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, नगर रचना सहाय्यक संचालक प्रभाकर नाळे, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थ‍ित होते.

No comments:

Post a Comment