Saturday, October 6, 2018

कुपोषणाचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक महिला व बालकल्याण सभापती- रजनी देशमुख


पंढरपूर, दि. 06 :- राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह हा उपक्रम  किशोर बालके व गरोदर महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.  स्तनदा माता व  किशोर बालकांसाठी  आवश्यक पोषण आहार देवून कुपोषाणाचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनी सांगितले.  
पंचायत समिती पंढरपूर येथील शेतकी भवन येथे पोषण आहार माह समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, जिल्हा परिषद सदस्या सविता गोसावी, पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे, सत्यवान देवकूळे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी हिला बाल कल्याणच्या सभापती देशमुख बोलताना म्हणाल्या,  कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गर्भवती महिला व लहान बालकांच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. पोषण आहाराबरोबरच स्वच्छतेला अतिशय महत्व आहे. गर्भवती महिला व बालकांच्या आहाराबाबत व परिसराच्या स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. तसेच त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन त्यांना सकस आहार दिला जावा असे ही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय पोषण अभियानात पंढरपूर तालुक्याचा जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे .ही कौतुकाचीबाब आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.तसेच आंगणवाडीसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे ही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत तालुक्यात 1 ते 30  सप्टेंबर या कालावधीत ‍ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आरोग्य स्वच्छता पोषण दिन, महिलांसाठी योगा, अंगणवाडी गाव स्तरावर पोषण मेळावा, आहार व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी  सांगितले.  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले आजचे युग हे स्त्री-पुरुष्‍ समानतेचे युग आहे. महिला सशक्तीकरणात महिलांचा सहभाग महत्वाचा आहे.महिला व बालकांच्या आहाराविषयी जनजागृती करण्यात महिलांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले
यावेळी  कार्यक्रमास अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनिस,तसेच महिला बालविकासचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                                             00000
5 Attachments

No comments:

Post a Comment