Wednesday, October 3, 2018

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी सभा


पुणे, दि. 3  – सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीचे आयोजन येत्या सोमवारी दिनांक 8 ऑक्टोबर 2018  रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती महसूल उपआयुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव प्रताप जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. सदरची बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरच्या पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात येते, अशी माहिती श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  
*****

No comments:

Post a Comment