Saturday, October 6, 2018

शासकीय योजनांसाठी लोकराज्य हे सर्वोत्तम माध्यम - सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे



पुणे, दि. 6 – महाराष्ट्र शासनातर्फे नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना व उपक्रम सुरू आहेत. या सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा यासाठी लोकराज्य हे सर्वोत्तम  माध्यम आहे, असे उद्गार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज काढले.
लोकराज्य मासिकाच्या सप्टेंबर महिन्याच्यासामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचेव ऑक्टोबर महिन्याच्या महाराष्ट्राच्या परिवर्तन कथाया विशेषांकाचे अवलोकन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश पुरोहित, पुणे विभागीय उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, सहायक संचालक वृषाली पाटील, संहिता लेखक हर्षल आकुडे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यातमहाराष्ट्राच्या परिवर्तन कथाया यशकथांवर आधारित विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश बापट हे या विशेषांकाचे अतिथी संपादक असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर विशेष लेख लिहिला आहे. या अंकात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या माहिती कार्यालयांद्वारे संशोधन करून लिहिण्यात आलेल्या यशकथा, उद्योजकता विकास, महिलांचे आर्थिक बळकटीकरण या विषयांवरील लेख, यशोगाथा व नावीन्यपूर्ण उपक्रम, विविध शासकीय योजना यांबाबत माहिती देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना श्री. कांबळे म्हणाले, गेल्या 70 वर्षांपासून शासनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकराज्य मासिक करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांसारख्या महापुरूषांवर आधारित व अन्य महत्त्वाच्या विषयांवरील लोकराज्य विशेषांकांनी आपला ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्याचामहाराष्ट्राच्या परिवर्तन कथाहा विशेषांकही उत्कृष्ट व माहितीपूर्ण आहे.
            लोकराज्यच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय यांची माहिती अधिकृतरित्या सामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. लोकराज्यमुळे अत्यल्प दरात माहितीचा खजिना सर्वसामान्यांना उपलब्ध होतो. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी वाचनीय व संग्राह्य असून प्रत्येकाने लोकराज्यचे वाचन नियमितपणे केले पाहिजे, असे आवाहन श्री. कांबळे यांनी केले.
****




No comments:

Post a Comment