Tuesday, October 9, 2018

वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करा -खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आवाहन




वाहतुकीच्या नियमांची
जनजागृती करा
-खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आवाहन
                सोलापूर दि. 9 :- रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतुकीच्या नियमांची प्रभावी जनजागृती करावी. अपघात होऊ नये  म्हणून अपघाताच्या ठिकाणी अंशकालीन दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आज दिल्या.       
                जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक शासकीय विश्रामगृहातील सभागृहात झाली. बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,  राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता .एल. भोसले, अधिक्षक अभियंता संतोष शेलार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्यासह समितीचे सदस्य, वरिष्ठ पोलीस अधिकारी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
               जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि जिल्हा मार्गावरील ब्लॅक स्पॉट ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून   आवश्यक उपाय योजना कराव्यात. रस्त्याच्या कडेची  काटेरी झुडपे तात्काळ काढावीत, वळणाच्या ठिकाणी साईन बोर्ड लावावेत.   ब्लॅक स्पॉट ठिकाणी  समिती  सदस्य तज्ञामार्फत पाहणी करावी, मोहेाळ पंढरपूर रस्त्यावरील पेनूर येथे वळणाच्या ठिकाणी गतीरोधक लावण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या .
वाहन चालवताना मोबाईल वरून बोलणे, मद्यपान करून गाडी चालवणे, सीटबेल्टचा वापर करणे, उलट्या दिशेने   वाहन चालवणाऱ्यावर कडक कारवाई करावी. साखर कारखाना सुरू होत असून  ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी आणि क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये यासंदर्भात साखर कारखान्याना सूचना द्याव्यात, असेही बैठकीत सांगण्यात आले.
000000


No comments:

Post a Comment