Wednesday, October 3, 2018

मतदानासाठी मतदार यादीत छायाचित्र अनिवार्य नाही - विभागीय आयुक्त यांचे स्पष्टीकरण


पुणेदि. 3 –मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीतया सबबीखाली कोणालाही मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाहीअसे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मतदार यादीत छायाचित्र नसल्यास मतदानाला मुकावे लागणार’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होतेया वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतोत्यामुळे याबाबत स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त डॉम्हैसेकर यांनी सांगितलेवृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त योग्य नाही.  मतदाराचे छायाचित्र असायला हवेमात्र ते अनिवार्य नाही.
वास्तविकविभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक या नात्याने दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत पत्रकारांना व राजकीय पक्षाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करताना डॉम्हैसेकर यांनी मतदार यादीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहेमतदारांनी मतदान ओळखपत्र प्राप्त करवून घ्यावेमतदार यादीत नाव आहे मात्र निवडणूक ओळखपत्र नाहीअशा स्थितीत  भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य धरण्यास विहित केलेल्या 17 पुराव्यांच्या आधारे मतदानास परवानगी दिली जाऊ शकतेतथापिओळखपत्र आहे मात्र मतदार यादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाहीअशी माहिती विभागीय आयुक्त डॉम्हैसेकर यांनी दिली आहे.
****

No comments:

Post a Comment