Thursday, October 4, 2018

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम


पुणे दि. 4: राज्यपाल चे. विद्यासागर राव हे शुक्रवार दि. 5 आक्टोबर 2018 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
            राज्यपाल चे. विद्यासागर राव हे शुक्रवार दि. 5 आक्टोबर 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता राजभवन मुंबई येथून हॅलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण करतील. सकाळी 10.05 वाजता राजबाग, लोणीकाळभोर येथील हॅलीपॅडवर त्यांचे आगमन होईल. सकाळी 10.10 वाजता ते मोटारीने लोणीकाळभोर येथील एमआयटी परिसरात पोहोचतील, ‘तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती प्रार्थना सभागृह व विश्वशांती ग्रंथालया’ला भेट देवून पहाणी करतील. सकाळी 10.40 वाजता राजबाग येथील हेलीपॅडवरून प्रयाण, सकाळी 10.55 वाजता पाषाण हेलिपॅडवर आगमन व मोटारीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन, बांबू हस्तकला ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन व बांबू हस्तकला ट्रेनिंग यशस्वी पुर्ण करणाऱ्या आदिवासी महिलांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम. दुपारी 12.00 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राजभवन, पुणेकडे प्रयाण व राखीव, दुपारी 12.30 वाजता राजभवन येथून पाषाण हेलिपॅडकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता पाषाण हॅलीपॅडवरून हॅलिकॉप्टरने मुंबई राजभवनकडे प्रयाण करतील.
*****

No comments:

Post a Comment