Thursday, October 4, 2018

शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसारात ऊर्दू लोकराज्यचा मोलाचा वाटा - पी. ए. इनामदार



पुणे दि. 4: अल्पसंख्यांक समाजासाठी शासनाच्या विविध योजना असून या योजनांचा यशस्वी प्रचार व प्रसार करण्यात ऊर्दु लोकराज्यचा मोलाचा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेसाठीही लोकराज्य उपयुक्त असून संपूर्ण आझम कॅम्पस ऊर्दू लोकराज्यमय करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पी. ए. इनामदार यांनी आज केले.
येथील विभागीय माहिती कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेट प्रसंगी श्री. इनामदार बोलत होते. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती सहायक संग्राम इंगळे, विलास कसबे उपस्थित होते.
श्री. इनामदार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचले. यामुळे अल्पसंख्यांक समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढले असून दहावीच्या परीक्षेत राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी 85 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त होतात. अल्पसंख्यांक समाजातील मुलांनीही आपली गुणवत्ता सिध्द केली आहे.
शासनाच्यावतीने अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची यशस्वी प्रसार व प्रचार करण्यात लोकराज्यचा मोलाचा वाटा आहे. लोकराज्यचा अंक ऊर्दू भाषेत प्रकाशित करण्यात येत असल्यामुळे या योजना चांगल्या प्रकारे अल्पसंख्यांक समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. लोकराज्यचा अंक दर्जेदार असून शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.      
0000





No comments:

Post a Comment