Thursday, October 4, 2018

हवामान आधारित विमा योजनेसाठी अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


सोलापूर दि. 4 :-  प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित 201        8-19 अंबिया बहार व गारपीट मध्ये सोलापूर  जिल्ह्याकरिता  द्राक्षे  मोसंबी, डाळींब पेरु, केळी, आंबा, लिंबू या फळापीकाकरिता विमा योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
कमी  / जास्त पाऊस,  वेगाचा वारा, गारपीट,  सापेक्ष आर्द्रता हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. फळपिक विमा योजना सोलापूर  जिल्ह्यात ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या विमा कंपनीची नियुक्ती केलेली आहे. योजना कर्जदारे शेतकऱ्यांना सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त विमा हप्ता विमा संरक्षित रक्कमेच्या 5  टक्के किंवा वास्तवदर्शी दर या पैकी जी कमी असेल ती रक्कम राहिल. योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी बॅकेकडे विमा प्रस्ताव वेळेत सादर करावेत. शेतकऱ्यांचे पीकविम्याचे अर्ज व विमा हप्ता रक्कम कॉमन सर्व्हीस सेंटर (CSC) केंद्रामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जातील. शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधारकार्ड, बॅक  खात्याचा तपशील इ कागदपत्र अर्जासोबत जोडणे बंधरकारक आहे.
शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बॅक शाखा तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक यांचे शाखेमध्ये संपर्क साधावा. अधिक  माहितीसाठी उपविभागीय  कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व संबधित गावाचे कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment