Monday, December 19, 2016

कोंढवा येथील महानगरपालिका शाळेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन




पुणे दि. 19 (विमाका) : कोंढवा येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रमांक 147 मुलांची, शाळा क्रमांक 65 मुलींची व शाळा क्रमांक 175 उर्दु माध्यम शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी या नूतन इमारतीचे नामकरण कै. सदाशिव उर्फ बापूसाहेब दरेकर असे करण्यात आले.
            यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुणे महानगर पालिकेचे महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, माजी नगरसेविका मंगला टिळेकर, प्रमोद दरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
            कोंढवा येथे पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या या शाळेच्या नूतन इमारतीचे काम सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आले आहे. या शाळेत कोंढवा परिसरातील 1800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
000000

No comments:

Post a Comment