Thursday, December 15, 2016

पंढरपूर शहर-उपनगरातील रस्त्यांची कामे त्वरित दुरुस्त करणार - राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील


नागपूर, दि. 15 : पंढरपूर शहर व उपनगरातील रस्त्यांची कामे त्वरित दुरुस्त करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य रामहरी रुपनवर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात प्रश्न विचारला होता. श्री. पोटे-पाटील म्हणाले की, या परिसरातील रस्त्यांवरुन मोठ्या प्रमाणात वाळू आणि ऊस वाहून नेणाऱ्या जड वाहनांची वाहतूक असल्याने रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेले आहेत. रस्त्यांच्या कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी ही कामे शासनाच्या विविध योजनांमधून हाती घेण्याचे नियोजन केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment