Monday, December 26, 2016

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानासाठी योग्य नियोजन करावे -- राजेंद्र मुठे

 नऊ जानेवारी पासून अभियानाचे आयोजन  

 पुणे, दि. 26 : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी दिल्या.
श्री. मुठे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालीयावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपआयुक्त(वाहतुक) प्रविण मुंढे, पोलीस अधीक्ष्क (द्रुतगती मार्ग ) अमोल तांबे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत   जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.
श्री. मुठे म्हणाले, दिनांक 9 ते 24 जानेवारी 2017 या कालावधीत 28 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात  येणार  आहे. रस्ते अपघातांची गंभीर समस्या रस्ता सुरक्षेबाबत जनतेची बांधिलकी या अनुषंगाने जनजागरण प्रबोधन करुन या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना  सहभागी करुन अभियानाची व्याप्ती वाढवावी. या अनुषंगाने या बैठकीमध्ये विविध  विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच संबंधीत विभागांना त्याबाबत अंमलबजावणीच्या  सुचना देण्यात आल्या.
हे अभियान परिवहन विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,राज्य परिवहन महामंडळ, पीएमपीएमएल, शिक्षण विभाग, सेवाभावी संस्था वाहतुकदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहेरस्ता सुरक्षा पंधवड्याचे आयोजन अंमलबजावणी, जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राचा आढावा घेऊन उपाययोजना करणे. द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी होण्यासाठी करावयाची उपाययोजना, सुरक्षित शालेय विद्यार्थी  वाहतुकीस प्रोत्साहन देणे नियमावलीची अंमलबजावणी करणे, अवैध प्रवासी  वाहतुकीविरुध्द कारवाई, विविध उपक्रमांद्वारे समाज प्रबोधन,जनजागृती विशेष मोहिमांचे आयोजन करणे, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रोड सेफ्टी ऑडीट, साईन बोर्ड माहितीचे बोर्ड लावणे, झेब्रा क्रॉसिंग इतर पटेट् रंगविणे, धोकादायक जाहिराती फलक काढणे आदी उपक्रम या कालावधीत घेण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याकरिता त्यांच्यासाठी  विविध स्पर्धा,व्याख्याने परिसंवादाचे आयोजन, वाहन चालकांची आरोग्य तपासणी,नेत्रतपासणी, गोल्डन अवर्स चे महत्त्व प्रथमोपचाराबाबत जनजागृती , अपघातांबाबत सेवाभावी संस्था विविध संस्थांच्या सहकार्याने अभियान राबविण्यात येणार आहे.   
000000


1 comment:

  1. नमस्कार सर
    आम्ही पुणे कार ड्रायव्हर पुणे शहर व पिंपरी चिंचवड येदिल चालक एकत्र येउन २०१७ हे वर्ष पुर्ण रस्ता सुरक्षा म्हणून साजरा करणार आहोत
    धन्यवाद
    संतोष मानमोडे
    9175367722
    www.facbook// punecardriver@gmail.com

    ReplyDelete