Tuesday, December 6, 2016

आय केअर चॅरिटेबल ट्रस्टच्या आनंदवन येथील नेत्रशिबिराचा १९०५ रुग्णांना लाभ


नागपूरदि. ६ : मुंबई येथील आय केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरोरा येथील आनंदवन येथे राबविण्यात आलेल्या नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचा 1905 रुग्णांनी लाभ घेतला. ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी या शिबिराचे मुख्य सर्जन म्हणून जबाबदारी सांभाळली.
आनंदवन येथे दि. २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत हे शिबिर राबविण्यात आले. त्यात  १९०५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबिरार्थींतील १०९ रूग्ण दोन्ही डोळ्यांनी अंध होते, तसेच ७५ रूग्णांना एकच डोळा असून त्यात मोतीबिंदू झाला होता. सुमारे १५०० रूग्णांचे मोतीबिंदू वेळेवर न काढण्यात आल्याने संपूर्ण पिकले होते, तर ७५ रुग्ण कुष्ठरोगाने ग्रस्त होते. या सर्वांना शस्त्रक्रियेनंतर दृष्टी प्राप्त झाली आहे.
समाजसेवक बाबा आमटे यांच्या काळात सुरु झालेल्या या शिबिराची परंपरा अखंडितपणे सुरु असून, डॉ. विकास आमटे व  डॉ. विजय पोळ, त्यांचे आनंदवनचे सहकारी, त्याचप्रमाणे  डॉ. सिद्धार्थ कांबळेडॉ. सुमीत लहाने, डॉ. रामदेव वर्मा यांच्यासह मुंबई येथील सर जे जे रुग्णालयाच्या टीमने शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.  चंद्रपूरचे नेत्रवैद्यक अधिकारी व एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनीही सहकार्य केले.
आजपर्यंतच्या अनेक शिबिरांतून सुमारे १ लाख ५४ हजार रूग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत.  
00000

No comments:

Post a Comment