Thursday, December 15, 2016

पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करु - दीपक केसरकर


नागपूर, दि.15 : राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करु, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिले.
          याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य श्री.हेमंत टकले यांनी उपस्थित केली. त्याला उत्तर देताना श्री. केसरकर बोलत होते.
 यावेळी श्री. केसरकर म्हणाले की, पोलीस उपनिरीक्षक यापदाच्या भरतीचे प्रमाणसरळसेवेतून 50 टक्के, विभागीय परीक्षेतून 25 टक्के व पदोन्नतीद्वारे 25 टक्के असे आहे. राज्यात नोव्हेंबर, 2016 अखेर पोलीस उपनिरीक्षक (बिनहत्यारी) संवर्गातील सरळसेवेने भरावयाची 1095 पदे व खात्याअंतर्गत विभागीय मर्यादीत परीक्षेद्वारे भरावयाची 828 पदे रिक्त आहेत. वरील 1095 पदांपैकी 750 पदे सरळसेवेने भरण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली असून याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि.7/12/2016 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तसेच, विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरावयाच्या 828 पदांसाठी उमदेवारांची लेखी परीक्षा झाली असून शारिरीक चाचणीबाबतच्या दुसऱ्या टप्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. पोलीसांना 8 तास ड्युटी देण्याबाबत मुंबई पोलीस दलातर्फे प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.
०००००


No comments:

Post a Comment