Monday, December 19, 2016

जिर्णोद्धार केलेल्या ऐतिहासिक नागेश्वर मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


पुणे दि. 19 (विमाका) : नागेश्वराच्या सातशे वर्ष जुन्या ऐतहासिक मंदीरास मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            सोमवार पेठेतील ऐतिहासिक नागेश्वर मंदीराचा जीर्णोद्धार महापालिकेच्यावतीने करण्यात आला. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करुन आज झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, माजी खासदार प्रदीप रावत, उपमहापौर मुकारी अलगुडे, महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर, नगरसेविका सोनम झेंडे आदी यावेळी उपस्थित होते.
            संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगतगुरु तुकाराम महाराज यांनी या ऐतिहासिक मंदिराला भेट देऊन नागेश्वराचे दर्शन घेतले होते असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिरातील कलाकृतींची पाहणी केली. त्यानंतर नागरेश्वराच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. यज्ञाचार्य तेजस सप्तर्षि आणि त्यांच्या सहायकांनी मंत्रांच्या उद्घोषात पुष्पवर्षाव करत नागेश्वराचा प्रसाद मुख्यमंत्र्यांना मिळावा म्हणून प्रार्थना केली.
0000

No comments:

Post a Comment