Thursday, December 8, 2016

पालखी तळ, रिंगण ठिकाणांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी आणि पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रीया तात्काळ सुरु करा


                 तीर्थक्षेत्र आराखड्यातील विकास कामे अंतिम करण्यासाठी दौरा

पंढरपूर, दि. 08  : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील मुक्काम आणि रिंगण सोहळा ठिकाणांना विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी आज भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे राजाभाऊ चोपदार, पालखी सोहळा प्रमुख बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे विश्वस्त योगेश देसाई होते.
श्री श्रेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्यातंर्गत पालखी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील मुक्माच्या आणि रिंगण ठिकाणाची पाहणी आणि विकास कामे अंतिम करण्यासाठी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी दौरा केला.
विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांचे आज दुपारी 1.00 वाजता नातेपुते येथे पालखी तळावर आगमन झाले तेथे जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे  यांनी नातेपुते येथील पालखी तळाबाबत माहिती दिली. यावेळी श्री राजाभाऊ चोपदार यांनी ही नातेपुते येथील जागा अपुरी पडत असल्याचे चर्चेवेळी सांगितले. यावेळी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुख, माळशिरसच्या तहसिलदार श्रीमती बी.एस.माने, गटविकास अधिकारी सुरेश मारकड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
श्री.चोक्कलिंगम यांनी त्यानंतर सदाशिवनगर, खडुस फाटा, वेळापूर, भंडीशेगांव, वाखरी येथे भेटी दिल्या या प्रत्येक ठिकाणी पालखी सोहळ्यास असणा-या अडचणी बाबत श्री. राजाभाऊ चोपदार, श्री आरफळकर यांच्याशी चर्चा केली. या समस्यांबाबत विकास कामांच्या माध्यमातून तोडगा काढला जाईल, असे विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी यावेळी सांगितले. त्यांनी बोरगांव, पिराची कुरोली, अकलूज येथील पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणांना भेटी दिल्या.
या दौ-यात सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, पंढरपूरचे तहसिलदार नागेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.         

000000
पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रीया तात्काळ सुरु करा
               विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांच्या सुचना:
पंढरपूर, दि. 08  : सोलापूर शहरासाठी एनटीपीसीच्या माध्यमातून करावयाच्या पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया तात्काळ सुरु करा अशा सूचना आज विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता बीं.डी.यमगर यांना दिल्या.
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि एनटीपीसी यांच्या दरम्यान सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार एनटीपीसी 250 कोटी रुपये प्रकल्पासाठी खर्च करणार आहे.  प्रकल्प व्यवस्थापन कंपनी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची  नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी झालेल्या बैठकीत 250 कोटी रुपये निधी  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यास महानगरपालिकेचा विरोध होता.
 यासाठी आज महापौर सुशिलाताई आबुटे, उपमहापौर प्रविण डोंगरे, स्थानिक समिती  सभापती रियाज हुंडेकरी, सभागृह नेता संजय हेमगड्डी, चेतन नरुटे, नरेंद्र काळे, आयुक्त विजय काळम पाटील यांनी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांची माळशिरस येथे शासकीय विश्रागृहावर आज दुपारी भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार,  जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे उपस्थित होते.त्यावेळी महापौर सुशिलाताई आबुटे यांनी पाणी पुरवठा योजनेबाबत महापालिका प्रशासन आणि एनटीपीसी यांच्या दरम्यान करार झाला आहे.त्यामुळे ही योजना पुर्ण करण्याच अधिकार माहापालिका आणि एनटीपीसीकडे असायला हवेत. त्यासाठीचा निधी खर्च करण्याचे अधिकारही महापालिका आणि एनटीपीसीकडे असायला हवेत, असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लगार  शुल्क म्हणून प्रकल्प खर्चाच्या तीन टक्के रक्कम देण्याची महापालिकेने तयारी दर्शविली आहे. मात्र महाराष्ट जीवन प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाने पाच टक्के द्यावी असे, सुचवले आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर त्याबाबत महापालिका सकारात्मक भूमिका घेईल असे यावेळच्या चर्चेत सांगण्यात आले.
यानंतर विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पुण विभागाचे मुख्य अभियंता बी.डी.बंडगर यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. आणि पाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेचा तात्काळ सुरवात करा, अशा सूचना दिल्या.
आयुक्त  विजय काळम -पाटील यांनी एनटीपीसीकडून येणारे 250 कोटी रुपये एनटीपीसी आणि सोलापूर महापालिकेच्या संयुक्त खात्यात ठेवले जातील. योजनेचे काम जसजसे पुर्ण होत जाईल तसे या खात्यातून देयके भागविण्यासाठी पैसे काढण्यास सोलापूर महापालिकेकडून नाहरकत परवाना दिला जाईल, असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता, महापालिकेचे अभियंता भालेराव, संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते
                                             0000000  

No comments:

Post a Comment