Wednesday, December 7, 2016

‘अदानी विल्मर लिमिटेड’वर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई सुरु -राज्यमंत्री मदन येरावार


       नागपूर, दि. 7 : अन्न व औषध प्रशासनातर्फे रायगड जिल्ह्यातील आजीवली (ता. पनवेल) येथील मे. अदानी विल्मर लि.या पेढीची तपासणीकरण्यात आली असून, तपासणीच्या वेळी ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल ऑईल(Blended edible vegetable oil) (Fortune Vivo) या खाद्य तेलाच्या पाकिटावर नमूद करण्यात आलेला तेलातील घटक व त्याचा शरीरावर होणाऱ्या परिणाबाबतचा मजकूर  दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई सुरु असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानसभेत दिली.
          याबाबतचा प्रश्न आमदार संजय सावकारे, सरदार तारासिंह यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. येरावार बोलत होते.
          यावेळी बोलताना श्री. येरावारपुढे म्हणाले की, फॉर्च्युन व्हिवो (Fortune Vivo) या तेलाचे पाच नमुने व फॉर्च्युन या फिजिकली रिफाइंड राईस ब्रँड (Fortune) या तेलाचे चार नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून 94,66,145 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेचविश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आलेले नमुने राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोग शाळा, पुणे यांच्याकडून तपासणी करण्यात आले असून येथे physically refined rice brand oil (Fortune) या तेलाच्या नमून्यात ॲसिड व्हॅल्यु मानकापेक्षा जास्त असल्याचे तर Blended edible vegetable oil (Fortune Vivo)या तेलाच्या पाकिटावर नमूद करण्यात आलेला मजकूर ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याने या प्रकरणी उत्पादकाला अन्न सुरक्षा व मानक कायदा 2006 च्या कलम 24 अंतर्गत नोटीस पाठविण्यात आली असून त्यावर व मानकाप्रमाणे नसणाऱ्या खाद्य तेलावर तपासाअंती आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही श्री. येरावार यांनी यावेळी सदस्यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
          या प्रश्नाच्या चर्चेत आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, गणपतराव देशमुख, विजय वड्डेटीवार, जयप्रकाश मुंदडा, एकनाथ खडसे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग घेतला.
000



No comments:

Post a Comment