Friday, September 21, 2018

शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘लोकराज्य’अग्रेसर - आमदार मेधा कुलकर्णी


पुणे दि. 21 : लोकराज्य’ हे मासिक अत्यंत दर्जेदार आहे. महाराष्ट्र शासनाचे ते मुखपत्र आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘लोकराज्य’ अग्रेसर असल्याचे प्रतिपादन आमदार मेधा कुलकर्णी यांनी आज केले.  
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘लोकराज्य वाचक अभियाना’ची संकल्पना पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी आमदार मेधा कुलकर्णी यांना सांगितली. त्यानंतर आमदार कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी नगरसेवक जयंत भावे, तात्यासाहेब ताम्हाणे, सहायक संचालक वृषाली पाटील, माहिती सहायक संग्राम इंगळे, संदीप राठोड, संजय गायकवाड, अक्षय माटे उपस्थित होते.
आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असणारे लोकराज्य हे मासिक अत्यंत दर्जेदार आहे. महाराष्ट्र शासनाचे ते मुखपत्र आहे. गेल्या सत्तर वर्षापासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे मासिक करत आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत लोकराज्य पोहोचविण्याची संकल्पना अत्यंत चांगली आहे.
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. याचा लाभ प्रत्येकाने घेण्याचे आवाहन आमदार कुलकर्णी यांनी केले.
*****




No comments:

Post a Comment