Wednesday, September 19, 2018

जिल्ह्याचा लौकिक कायम राखूया जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत आवाहन


सोलापूर, दि. 18 -  सोलापूर जिल्हा जातीय सलोखा आणि शांततेचा पुरस्कर्ता आहे.  सोलापूर जिल्ह्याचा लौकिक कायम राखू, असं आवाहन आज जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत आज करण्यात आले. 
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय शांतता समितीच्या बैठकीत आज हे आवाहन करण्यात आले. बैठकीस आमदार बबन शिंदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आदी उपस्थित होते.
            आमदार बबन शिंदे यांनी सांगितले की गणेशोत्सव आणि मोहरम सण एकत्र आले आहेत. हे दोन्ही सण आपण एकत्र येऊन साजरा करुया. 
            जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की जिल्ह्यातील सामाजिक सलोखा राखण्याची खरी जबाबदारी ही समाजातील विविध घटकांची आहेत. सोलापुरात ही जबाबदारी सर्व समाजातील नागरिक अतिशय चोखपणे पार पाडतात. जिल्ह्यातील शहरांतील महत्वाच्या चौकात सीसीटीव्ही बसवावेत.
            पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की , जिल्ह्यात गेल्या पाच सहा महिन्यांत विविध आंदोलने झाली. त्यामध्ये एसटी बसेसचे नुकसान झाले. हे टाळायला हवे. सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करायला हवा.  याबाबत सर्व समाजाने याबाबत जागरूक रहावे.
            यावेळी मोहोळचे कासिम मणियार, माळखांबीचे प्रशांत शेळके, दक्षिण सोलापूरचे बी. एन. गायकवाड, पंढरपूरचे भीमराव शिंदे, तळेहिप्परगा येथील विशाल कांबळे, अक्कलकोटचे बसवराज हांजगी, मोहोळचे  बिलाल शेख  यांनी मनोगत व्यक्त केले.
            यावेळी उपविभागीय अधिकारी शमा ढोक, ज्योती पाटील, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे, प्रमोद खांडवी, तहसीलदार मधुसूदन बर्गे, ऋषीकेश शेळके, सदाशिव पडदुणे, अंजली मरोड आदी उपस्थित होते.
'डॉल्बीचा वापर नको'
            अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.  न्यायालयाच्या या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाईल.  यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले.
0000




No comments:

Post a Comment