Wednesday, September 26, 2018

औषध विक्रेत्यांच्या बंदबाबत प्रशासनाकडून आवाहन


         सोलापूर दि. 26 :- अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना ( AIOCD) व महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता संघटनेने ( MSCDA) संपुर्ण भारतभर येत्या शुक्रवारी राज्यातील सर्व ठोक व किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवण्याबाबत घोषणा केलेली आहे.  त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त ,अन्न व औषध प्रशासन, कार्यालयाकडुन सर्व औषध विक्रेत्यांना संपात सहभागी न होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.  या बंदच्या काळात गरज असलेली औषधे स्वत:कडे मुबलक प्रमाणात उपलब्ध्‍ करुन ठेवावेत. तरीही औषध मिळणेबाबत काही अडचण आल्यास कार्यालयातील खालील अधिकाऱ्यांशी दूरध्वनी वा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मु.पो. पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
1)  कार्यालय दूरध्वनी क्रमांक                0217-2726572
2) श्री भु. पो. पाटिल, सहाय्यक आयुक्त   9689551666
3) श्री ना. सि. भालेराव, औषध निरिक्षक     9405783636
4) श्री  रो. शं. राठोड,  औषध निरिक्षक       9545960799

No comments:

Post a Comment