Friday, September 21, 2018

सुवर्णकन्या राही सरनोबत यांचा विभागीय कार्यालयाच्यावतीने सत्कार



पुणे दि. 21 : सुवर्णकन्या राही सरनोबत यांचा विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आशियाई खेळात 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतल्याबद्दल तसेच अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राही सरनोबत यांचा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त (विकास) प्रताप जाधव, सहाय्यक उपायुक्त विलास जाधव, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर म्हणाले, राही सरनोबत यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी दमदार आहे. नुकताच त्यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यामुळे आजच्या सत्काराला विशेष महत्व आहे. त्यांनी आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करून ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवावे, हीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. प्रशासनात उपजिल्हाधिकारी असल्याने राही सरनोबत या प्रशासनाचा एक भाग आहेत, त्यामुळे त्यांचा विशेष अभिमान वाटत असल्याचे डॉ. म्हैसेकर म्हणाले.
राही सरनोबत म्हणाल्या, खेळ हेच माझे प्रथम कर्तव्य आहे. संपर्ण देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. उपजिल्हाधिकारी म्हणूनही मला प्रशासनातही आपल्या कामाचा ठसा उमटवायचा आहे. प्रशासनाच्यावतीने घेण्यात आलेला आजचा कार्यक्रम हा माझ्यासाठी विशेष महत्वाचा असून हा सत्कार मला कायमच प्रेरणा देणारा ठरेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास जाधव यांनी केले. तर आभार उपायुक्त विलास जाधव यांनी मानले.


*****











No comments:

Post a Comment