Friday, September 21, 2018

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश



            सोलापूर दि. 21 :-   जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुकीनिमित्त 24 सप्टेंबर रोजी सायं.      5-30 पासून 26 सप्टेंबर 2018 रोजी  सायं 5-30 पर्यंत  आणि संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी असलेल्या ठिकाणी दि. 27 सप्टेंबर 2018 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व देशी व विदेशी मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
करमाळा तालुका- लव्हे, वरकुटे.  माढा- रोपळे क, पिंपळनेर. बार्शी- घारी, लाडोळे, सुडी.,  मोहोळ- वडदेगाव, गोटेवाडी, कोन्हेरी, लमाणतांडा. पंढरपूर तालका- जळोली, पांढरेवाडी, गार्डी, जाधववाडी. माळशिरस- डोंबाळेवाडी कु, झंजेवाडी खु., पिलीव, कदमवाडी, सुळेवाडी, जाधववाडी, हनुमानवाडी, झिंजेवस्ती, भांबुर्डी. सांगोला- वाढेगाव, राजापूर, सोनंद, गळवेवाडी, बागलवाडी, सोनलवाडी. मंगळवेढा तालुका- लक्ष्मीदहीवडी, मानेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, डिकसळ, देगाव, रेवेवाडी, जित्ती, हुन्न्र, कागष्ट, खवे, येळगे. दक्षिण सोलापूर- तिल्लेहाळ,उळे, उळेवाडी, औज (आ), आलेगाव, कुडल आणि अक्कलकोट तालुक्यातील बिजंगरे/हालहळ्ळी, धारसंग, केगाव बु., म्हैसलगे, रामपूर/इटगे, शावळ, तळेवाडी, कुडल, केंगाव खु., कलकर्जाळ, जकापूर, कंठेहळ्ळी, घुंगरेगाव.
हे आदेश महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142  अन्वये देण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे.
*****

No comments:

Post a Comment