Wednesday, September 19, 2018

भरपूर अभ्यास करा, खूप शिका पालकमंत्री देशमुख यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद


          सोलापूर दि. 18 – भरपूर अभ्यास करा, खूप शिका सोलापूरचे नाव रोशन करा, असा सल्ला आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
            पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज सोलापूर जिल्हा कर्मचारी कल्याण निधी संचलित व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत  मान्यता प्राप्त वसतीगृहाचे आज येथील रंगभवन परिसरातील इमारतीमध्ये उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
            येथील रंगभवन परिसरातील इमारतीमध्ये वसतीगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्री देशमुख यांनी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खूप शिका, सोलापूरचे नांव रोशन करा. शिक्षणात अथवा कसली समस्या असल्यास मला अथवा जिल्हाधिकारी भोसले यांना संपर्क साधा, असे सांगितले.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, माऊली पवार, दत्ता मामा मुळे, अनिल कादे, प्राचार्य महेंद्र चितलांगे, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, दीपक शिंदे आदी उपस्थित होते
            सध्या महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित इमारतीच्या चार खोल्या वसतिगृहासाठी घेण्यात आल्या आहेत. त्यातील दोन खोल्यात प्रत्येकी सात आणि दोन खोल्यात प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था होऊ शकते. वसतिगृहात प्रवेशासाठी एकूण बारा विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी सात विद्यार्थी पात्र असून त्यांना प्रवेश देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले..
000



No comments:

Post a Comment