Friday, September 21, 2018

शिष्यवृतीच्या प्रलंबित अर्जाबाबत सामाजिक न्यायकडून मोहिम


            सोलापूर दि. 21 :-   अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, फ्री शिपचे ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे, असे अर्ज निकाली काढण्यासाठी  समाज कल्याण कार्यालयामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
            सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीत महाविद्यालयीन स्तरावर जिल्ह्यात 3426 अर्ज प्रलंबित आहेत. प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांनी 23 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रलंबित पात्र व परिपूर्ण अर्जासह बी स्टेटमेंट ऑनलाईन सादर करावे. प्रलंबित अर्ज सादर न केल्यास असे अर्ज निकाली झाल्याचे समजून ऑनलाईन संगणक प्रणालीतून अर्ज काढून टाकले जातील.
            ऑनलाईन प्रणालीतून अर्ज काढून टाकल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याची प्रलंबित शिष्यवृत्ती, शिक्षण फी आदा करण्याची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्याची राहील, असे सहाय्यक आयुक्त सपना घोळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.    
*****

No comments:

Post a Comment