Tuesday, September 25, 2018

आणिबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींच्या सन्मानाचे धोरण जाहीर


पुणे दि. 25- देशात दिनांक 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणिबाणी घोषीत करण्यात आली होती. या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान करण्याबाबतचे धोरण महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. या अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी खीलील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
 एका महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार व त्यांच्या पश्चात पत्नीस/पतीस पाच हजार रुपये मानधन देण्यात येईल. एका महिन्यापेक्षा कमी करावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये व त्यांच्या पश्चात पत्नीस/पतीस मासिक अडीच हजार रूपये मानधन देण्यात येईल. यासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींना अर्जासोबत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. मिसा अंतर्गत अटक झालेल्या व्यक्तींना मानधन मंजूर करण्याचे अधिकार संबंधीत जिल्हाधिकारी यांना असतील. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असणे आवश्यक आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे.  
0000

No comments:

Post a Comment