Wednesday, September 26, 2018

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेस सुरवात नागरिकांनी सहकार्य करण्याचे सहाय्यक संचालक वर्षा माने यांचे आवाहन


सोलापूर, दि. 26 - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम 24 सप्टेंबर पासून सुरू झाली असून नऊ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती  राज्यस्तरीय निरीक्षक डॉ सुनील भडकुंबे यांनी दिली आहे. याबाबत सर्व्हेक्षणासाठी घरी येणाऱ्या पथकास योग्य ती माहिती नागरिकांनी द्यावी, असे आवाहनही सहाय्यक संचालक डॉ. वर्षा माने यांनी केले आहे.
डॉ. माने यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिलेल्या माहितीनुसार समाजात लपून राहिलेले कुष्ठरोगी लवकरात लवकर शोधून काढून त्यांना औषधोपचाराखाली आणणे, नव्या रुग्णांवर तत्काळ औषधोपचार सुरू करुन संसर्ग साखळी खंडीत करुन रोगाचा प्रसार कमी करणे आणि कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे, अशी उद्दीष्टे आहेत.
मोहिमेच्या कालावधीत संपूर्ण ग्रामीण आणि निवडक शहरी भागातील लोकसंख्येचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील ३४०४६२०  लोकसंख्येच्या सर्व्हेक्षणासाठी ३११३  पथके तयार करण्यात आली आहेत. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली त्या त्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती डॉ. माने यांनी दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment