Wednesday, September 26, 2018

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आवाहन


सोलापूर, दि. २६-  मतदार छायाचित्र याद्यांचा पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तरी नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळण्यासाठी, हरकत घेण्यासाठी, तपशीलात बदल करण्यासाठी तसेच पत्ता बदल करण्यासाठी आवश्यक अर्जांचे नमुने भरावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, प्रारुप मतदार याद्या ची प्रसिद्धी सर्व मतदान केंद्रावर, मतदान नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात आली आहे. नागरिकांनी पुनरीक्षण कार्यक्रम कालावधीत खालील अर्ज भरून संबंधित कार्यालयात सादर करावे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक सहा अर्जाचा वापर करावा. अनिवासी भारतीयांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 अ अर्जाचा वापर करावा. मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी अथवा हरकत घेण्यासाठी नमुना सात क्रमांक अर्जाचा वापर करावा. मतदार यादीतील तपशीलात बदल करण्यासाठी नमुना आठ आणि विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पत्ता बदल करण्यासाठी नमुना आठ अ अर्जाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार नोंदणी अथवा बदल करता येतो, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी कळविले आहे.
विभागीय आयुक्त शुक्रवारी सोलापुरात
छायाचित्र मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर निरीक्षक आहेत. ते येत्या शुक्रवारी सोलापूर जिल्हा दौ-यावर येणार आहेत.
            मतदार यादी कार्यक्रमाचे महत्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे-
अ.क्र.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे
कालावधी
1
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी
दिनांक 01/09/2018 (शनिवार)
2
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
दिनांक 01/09/2018 (शनिवार) ते 31.10.2018 (बुधवार)
3
दावे व हरकती निकालात काढणे
दिनांक 30/11/2018 (शुक्रवार)
4
अंतिम मतदार यादी प्रसिध्दी
दिनांक 04 जानेवारी 2019 (शुक्रवार)

No comments:

Post a Comment