Tuesday, September 25, 2018

नियोजन समितीची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करा पालकमंत्री विजय देशमुख यांच्या नियोजन समितीच्या बैठकीत सूचना


सोलापूर, दि. 25 - जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या विकास कामामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावणे महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने विकास कामांची अंमलबजावणी करावी.   जिल्हा नियेाजन समितीच्या निधीतून होणारी कामे कार्यान्वयीन यंत्रणांनी  येत्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिल्या.
            पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज  जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील  बहुद्देशीय सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, बबनदादा शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की,  'सन 2018-19 साठी जिल्ह्याच्या विकासासाठी    339.77 कोटी  रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. त्यापैकी सत्तर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. संबंधित यंत्रणांना निधी  वितरीत करण्यात आला आहे. आता अधिकारी आणि यंत्रणा यांनी आपल्या विभागाकडून प्रस्तांवाना तांत्रिक मान्यता घ्याव्यात. जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता घ्याव्यात . लवकरात लवकर कामांना सुरुवात करावी.'  संबंधित कामे वेळेत आणि दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे.
            गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा जवळपास संपूर्ण खर्च झाला. यावेळी ही सर्व निधी खर्च व्हावा त्यामाध्यमातून जास्तीत जास्त विकासाची कामे व्हावीत, असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
            स्वाईन फ्लू, डेंग्यू  आजाराचे रुग्ण  जिल्हृयात आढळून आल्यास आरोग्य यंत्रणेकडे पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे.  आरोग्य यंत्रणेने या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रभावी जनजागृती करावी.  जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आणखी रुगणवाहिका  उपलब्‍ध होण्यास शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.
            सन 2018-19 मधील जिल्हा नियेाजन समितीकडील 52 टक्के निधी यंत्रणांनी मंजूर कामांवर खर्च केला आहे.  यामध्ये कृषी व संलग्न सेवा-32.75 टक्के, ग्रामविकास- 23.78 टक्के, उद्योग  व खाण – 14.41 टक्के, परिवहन – 89.92 टक्के, सामान्य  सेवा विभागाने -40.78 टक्के निधी खर्च केला आहे.   अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत 2018-19 साठी 147 कोटी 52 लाख निधी मंजूर असून या निधीपैकी 103 कोटी 26 लाख 40 हजार इतका निधी खर्च झाला असून  खर्चाची टक्केवारी 70 टक्के इतकी आहे.
           
जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील टंचाई सदृश्य परिस्थिती बाबतीत तत्काळ कार्यवाही केली जाईल. यासाठी महसूल, जिल्हा परिषद, कृषि विभाग , सहकार विभाग यांना सूचना दिल्या आहेत, असे सांगितले.
            बैठकीस  जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सदस्यां बरोबरच जिल्हा परिषद, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, शिक्षण, जलसंपदा, जलसंधारण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  बैठकीपूर्वी पंडीत दिनदयाळ उपाध्याय  यांच्या प्रतिमेस पालकमंत्री देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली.   स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना  दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली.
पालकमंत्री म्हणाले :
·         मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे दर्जेदार व्हावीत.
·         जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांच्या भरतीसाठी बैठक घेणार
·         पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांकडे बैठक घेऊ
·         अवैध सावकारीस आळा घालण्यासाठी आवश्यक कारवाई करा
जिल्हाधिकारी म्हणाले,
·         नवीन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीचे सभागृह लवकरच पूर्ण
·         जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक नवीन सभागृहात होईल
·         जिल्ह्यात जलयुक्तची 80 टक्के गावांत कामे
·         तालुका क्रीडा संकुल समितीचा प्रस्ताव आल्यास कामे नावीन्यपूर्ण योजनेतून
0000





No comments:

Post a Comment