Wednesday, September 19, 2018

जिल्ह्यात पशुवैद्यकीय सेवा दर्जेदार करणार -पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे प्रतिपादन


सोलापूर दि 19 :- जिल्ह्यात पशुधन वाढाव, पशुधनासाठी चांगल्या व दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी  पशुसंवर्धन्‍ विभागामार्फत आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी अकलूज येथे केले.
अकलूज येथे बांधण्यात आलेल्या तालुका लघु पशु वैद्यकीय  चिकित्सालयाचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री जानकर यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहितेपाटील यांच्यासह पदाधिकारी, पशुपालक उपस्थित होते.
मंत्री जानकर म्हणाले, ‘अकलूज येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय या भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनास सेवा देण्याचे महत्वाचे काम होणार आहे. अकलूज येथील पशुचिकित्सालय  जिल्ह्यात महत्वाचे केंद्रातून  पशुधनासाठी चांगल्या दर्जेदार सेवा मिळव्यात  यासाठी सोनोग्राफी, एक्सरे मशिनच्या युनिटाला मंजुरी दिली जाईल.’
*****

No comments:

Post a Comment