Friday, September 21, 2018

आयुषमान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते रविवारी ई-कार्ड वाटप


         पुणे दि २१ :   प्रधानमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते 23 सप्टेंबर,2018 रोजी आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन रांची ( झारखंड ) येथून होणार आहे. उद्घाटनाचा कालावधी दुपारी 1.30 ते दरम्यान होणार आहे. राज्यस्तरावर मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते तसेच जिल्हास्तरावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या योजनेच्या लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र राज्यात आयुषमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर या योजनेंतर्गत, पालकमंत्री यांच्या हस्ते दु. 3.45 ते 4 या कालावधीत आयोजित कार्यक्रमात अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करुन सेवा चालू करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना अंगीकृत रुग्णालयात ई-कार्ड साठी नोंदणी करता येईल.
            प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. या योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक जणगणनेमधील लोकांना मिळणार आहे. या योजनेमध्ये आपल्या कुटुंबाचे नाव आहे का, हे जाणून घेण्यासाठी www.abnhpm.gov.in या वेबसाईटला भेट देऊन किंवा 14555/1800111565 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन नवल किशोर रामजिल्हाधिकारीपुणे यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment