Wednesday, September 19, 2018

अनुसूचित जाती उपयोजनेतर्गेत शेतावर मृद व जलसंधारणाचे उपचारासाठी योजना


  पुणे, १९- जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत (विशेष घटक योजना) अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यासाठी पुणे जिल्ह्यास एक कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
                  अनुसूचित जातीमधील शेतक-यांना उत्पन्नाचे इतर कायम स्वरुपी साधन नसतेत्यांचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता  कृषि उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि विभागातर्फे पाणलोट विकास कार्यक्रम राबण्यात येत आहे.
                 अनुसूचित जातीच्या शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखणे यासाठी हि योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत  आहे. या योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची संमती घेऊन त्यांच्या वैयक्तीक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाचे सलग समतल चरकंपार्टमेंट बंडीगअनघड दगडी बांधशेततळेमजगी,जुने भात शेती दुरुस्ती इ. व सामुहीक स्वरुपाचे माती नाला बांधसिंमेंट नाला बांध इ. उपचार घेण्यात येतात.
                या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा इ. कागदपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेऊ  इच्छित असलेल्या शेतक-यांनी कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारीमंडळ कृषि अधिकारीकृषि पर्यवेक्षककृषि सहायक तसेच उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे यांनी केले आहे.
००००

No comments:

Post a Comment